रसिक जनांची स्वीकृत सेवा
वंदन करतो तुज मी देवा
प्रथम पुजेचा मान तुम्हाहो
गणेश दर्शन करतो देवा
देई आम्हा तूच भरवसा
काळाचा अगाध महिमा
तू जगाताचा स्वामी देवा
तुझ्या कृपेचा निर्मम ठेवा
राहे हात तुझा भक्तांवर
आम्ही पामर काय जाणतो
तूच त्रिकालि तूच साजिरा
भुत भार हे तूच जाणतो
मम हृदयी तव प्रीत वसु दे
सदा तुझी सय नित्य असुदे
तुझ्या वीना क्षणेक नसुदे
तुझी भक्ति नितरित असुदे
प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment