तव भजना नित्याते करुनी भक्तीने
लीन चरणी नित राजी स्वीकृत तू करणे
तव महिमा सांगावा भाव पुरे नाम्हा
काळाच्या पार तू रे तारिसी सर्वेषां
जय देव जय देव विघ्नेश्वर देवा
भव सागर तरण्याची बुद्धि दे सर्वा ||1||
कार्याच्या आरंभी तुज वन्दी सारे
अगणित तू रूपाने भावसी आम्हा रे
तू दिनकर तू शशिधर भास्कर तू जगती
तव नामे उद्धरिले हे जन कोटि रे
जय देव जय देव ........... ||2||
व्हावी या जगताची सारी कर्मे रे
जोवर शशी रजनी रवी तुझा महिमा रे
भक्तांच्या हाकेला धावुनिया येसी
प्रेरक रे जगदीशा कविवर नामा रे
जय देव जय देव ........... ||3||
प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment