निघाला स्वये मुषकांच्या अरुढि
उरी घेऊनी भक्त भेटीस रूढ़ि
उभा ठाकला अंश सर्वेश्वरीचा
नमुया सदा भक्तीने श्रीगणेशा
चतुरस्र कीर्ति अलौकिक मूर्ति
गजाने दिली साजिरि वदनशोभा
मुखी तेज ते सौरउर्जेपरी ते
नभी माईना चांदण्याचीच आभा
उरे मत्त ते मारिले रे कितीक
गणे कोण ते जाहले भक्त लक्ष्य
तुण्ड ते मोहिले वक्रशुण्डाविहारे
भले रक्षिले दानवे करुनी भक्ष्य
बहुविध ते सार चौसष्ठतेचे
तुम्हा पायी त्या लीन विद्या अनेके
उरी वाहतो भक्त चिंता सदारे
तुम्हा वन्दितो लीन पायी कविरे
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment