तुझे हास्य
आज तुला हसवल मजा आली
आणि वाटल असाच काळ थांबावा ।।
तुझ्या निर्मळ हास्याचा आनंद
घेता घेता काट्याला टांगावा ।।
उजाडाव लखख तस हसाव
वाऱ्याची मंद झुळुक तस हसाव ।।
एक सुरेल तान तस हसाव
इंद्रधनुचा रंग तस हसाव ।।
वाऱ्याची मंद झुळुक तस हसाव ।।
एक सुरेल तान तस हसाव
इंद्रधनुचा रंग तस हसाव ।।
उत्कट प्रकटावा आनंद तस हसाव
मस्त कोवळि सकाळ तस हसाव ।।
ग्रीष्मात छान गारवा तस हसाव
निष्पाप अल्लड़पणा तस हसाव ।।
मस्त कोवळि सकाळ तस हसाव ।।
ग्रीष्मात छान गारवा तस हसाव
निष्पाप अल्लड़पणा तस हसाव ।।
आज खरच छान तसंच वाटल
देवळातील घंटानाद ऐकला ।।
देवपूजेत तुपवात लावली
आणि उजळल घर तस वाटल ।।
देवळातील घंटानाद ऐकला ।।
देवपूजेत तुपवात लावली
आणि उजळल घर तस वाटल ।।
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment