मैत्रीचा फास
फास तुझ्या स्मिताचे
कधी न सुटुदे सखे।।
फास तुझ्या शब्दांचे
बंधनी ठेवूदे सखे ।।
फास तुझ्या नजरेचे
खिळवून ठेवूदे सखे ।।
फास निर्मळ मनीचे
मम मनी गुंफूदे सखे ।।
फास शुद्ध रुधिराचे
धमनीत वाहूदे सखे ।।
पाश आणि फास
दोन्ही वेगळे सखे ।।
मन गुंतून बेड़ी पड़े
पाश असती ते सखे ।।
मन धावे उल्हासून
फास म्हणती त्या सखे ।।
कधी न सुटुदे सखे।।
फास तुझ्या शब्दांचे
बंधनी ठेवूदे सखे ।।
फास तुझ्या नजरेचे
खिळवून ठेवूदे सखे ।।
फास निर्मळ मनीचे
मम मनी गुंफूदे सखे ।।
फास शुद्ध रुधिराचे
धमनीत वाहूदे सखे ।।
पाश आणि फास
दोन्ही वेगळे सखे ।।
मन गुंतून बेड़ी पड़े
पाश असती ते सखे ।।
मन धावे उल्हासून
फास म्हणती त्या सखे ।।
मैत्रीचा पाश नसे
फास हां असे सखे ।।
कोमल हृदयात फास
मैत्री नित्य राहुदे सखे ।।
फास हां असे सखे ।।
कोमल हृदयात फास
मैत्री नित्य राहुदे सखे ।।
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment