दुरावा
वाटतय आता सर्व रस्ते unconnect असतील
आयुष्यात दोन दिवस disconnect राहतील।।
दोन दिवस घसा माझा पुन्हा thirsty असेल
रिकामपणाचे काहूर मनाला दोन दिवस twist करेल।।
आता पुन्हा दोन दिवस सुर काही लागणार नाही
पुन्हा तीच तान तोच ठेका डोलायला लावणार नाही।।
स्वच्छ आकाश उगाचच मळभासम भासत राहील
निस्तेज असेल वृत्ति काहीतरी उगाच डाचत राहील।।
सुमार असतील दाही दिशा रीते अवकाश हसत राहील
कुठे तुझी मैत्रीण हाच मुद्दा छद्मिपणे ठासत राहील।।
जगात सर्व सुरळीत व्यवस्थित असेल तरीही
एक काटा एक बोच सर्व ठीकठाक असेल जरिहि।।
पण एक आशा असेल त्यात पुन्हा जीवन फुलण्याची
दोन दिवसा नंतर तरी चेहरा माझा खुलण्याची ।।
कवी: मेदिनी
Comments
Post a Comment