चुका
कठीण असत सहज म्हणून बोलतो
विचार मागून करतो आधीच बोलतो
कस काय होत काही कळत नाही
इतक होऊन सुद्धा पुन्हा तसच करतो
विचार मागून करतो आधीच बोलतो
कस काय होत काही कळत नाही
इतक होऊन सुद्धा पुन्हा तसच करतो
विचार समोरच्याचा कधीतरी कर रे
अधाशि चर्चा उपाशी विचार नको रे
उगाच गढूळ करून जातोस पाणी
कशी होईल क्षुधा शांत देकार नको रे
अधाशि चर्चा उपाशी विचार नको रे
उगाच गढूळ करून जातोस पाणी
कशी होईल क्षुधा शांत देकार नको रे
वागण्यातली शुद्धता असुदेत ध्यानात
बोलताना उच्चार तोलून घे मनात
मापुन टाक पाऊल इथे कारण स्पष्टच
निसरड्याची पाऊल वाट तिची जनात
बोलताना उच्चार तोलून घे मनात
मापुन टाक पाऊल इथे कारण स्पष्टच
निसरड्याची पाऊल वाट तिची जनात
तू काही हीरो नाहीस सिनेमातील
हां काही सीन नाही सिनेमातील
जबाबदारी असावी जाण सतत
दोघ जाणता जग नाही मनातील
हां काही सीन नाही सिनेमातील
जबाबदारी असावी जाण सतत
दोघ जाणता जग नाही मनातील
यापुढे उगिचच करू नकोस अस
मनात येईल ते बोलू नकोस काही
विचार सारासार सतत ठेव जाण
हात आगीत आहे विसरु नकोस काही
मनात येईल ते बोलू नकोस काही
विचार सारासार सतत ठेव जाण
हात आगीत आहे विसरु नकोस काही
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment