घाव
चूक केलीस रीता केलास मानाचा कोपरा
एक दोष टाकलास विचार न करता सारा ।।
तुझा भाव भाव, दुसर्याचा काय ठाव तुला
तुझ मन मन ,दुसर्याचा काय मान तुला ।।
दोन मन जुळतात तेच वेड्या मैत्रीचे बंध
येतो साध्या फुलानाही केवड्याचा गंध ।।
तूच तुझा करतोस विचार तिचा कर कधी
ठाव तिच्या मनचाही घेत जा तू कधी।।
एक वार फिरून पुन्हा विचार कर आता
फुंकर की घाव आधी विचार कर आता।।
अशी वेळ येऊ देऊ नकोस कधी पुन्हा
विशेष विचार कर आता मन जपताना ।।
कवी: मेदिनी
Comments
Post a Comment