सोबत जोडलेला व्हीडिओ पाहिला. ज्यात पोलिसांनी वारकरीबुवांना पंढरपूरच्या वेशीवर अडवलं. बुवानी तिथेच पोलिसांना नमस्कार केला आणि परतीचा रस्ता धरला. हे पाहिलं आणि मन भारावून गेलं. राग नाही, त्रागा नाही, अपशब्द नाही, हे पाहून अद्भुत वाटलं मला. म्हणून लगेच एक काव्य सुचलं ते लिहून काढलं.
खऱ्या भक्तीचा मंत्र घेतला
वेशीपाशी पांडुरंग पाहिला
नमन देहातील ईश्वराला
सर्वत्र विठ्ठल दिसे त्याला
कुठून आले वारकरी बुवा
विठ्ठल भेटीची आस मना
पायीच्या त्या जडजीवाला
विठ्ठल वेशीपाशी भेटला
खऱ्या भक्तीचा मंत्र घेतला
लागले पिसे भक्तीचे तया
चेतवून भाव जाळून माया
फक्त नाम विठ्ठल घ्याया
जन्म त्याने जगी या घेतला
खऱ्या भक्तीचा मंत्र घेतला
उगा नाही राग ध्यानी
उगा नाही खेद मनी
उगा नाही त्रागा जनी
भजे जळीस्थळी त्याला
खऱ्या भक्तीचा मंत्र घेतला
गाव पंढरी मी पोचलो
वेशीपाशी मी अडकलो
विठ्ठलइच्छा दर्शना आलो
जीव हा वेशीवर विसावला
खऱ्या भक्तीचा मंत्र घेतला
©®कवी : प्रसन्न आठवले
२८/०६/२०२०
१६:५१
Comments
Post a Comment