आम्ही छाताडावर करतो नाच
करोनाच्या छाताडावर करतो नाच
उभे घेतो अंगावर विषाणू
शास्त्रज्ञच सारे आम्ही जणू
आम्ही विष पचवतो आज
आम्ही छाताडावर करतो नाच
आले वादळ झेलले आम्ही
त्याला पळवून लावले आम्ही
आम्ही त्याचाही उतरवला माज
आम्ही छाताडावर करतो नाच
साऱ्या देशात अव्वल आम्ही
ठेवला आलेख वाढता आम्ही
आम्ही राज्याची उंचावली मान
आम्ही छाताडावर करतो नाच
मोठ्या पदाची आशा लागली
पीएम पदाची खुर्चीच आपली
शिवसैनिकाला घालू सरताज
आम्ही छाताडावर करतो नाच
कवी : आपलेच आठवले
१९/०६/२०२०
Comments
Post a Comment