Skip to main content

नेहरु आणि चंद्रशेखर आझाद

नेहरु आणि चंद्रशेखर आझाद

 

हे वाचल्यानंतर, आपण निश्चितपणे एखाद्या व्यक्तीसस्वातंत्र्यसैनिकया यादीतून काढून टाकाल. भारताच्या संघर्षासाठी लढणार्या खर्या योध्यांना त्यांचं श्रेय कधीच दिलं गेली नाही आणि मुख्य प्रवाहात लपलेल्या दुर्मिळ कागदपत्रांचे विश्लेषण केल्यावर हे दिसून येते.

जेव्हा आम्ही क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिकांविषयी बोलतो तेव्हा चंद्रशेकर आझाद यांचे नाव कधीच विसरता येणार नाही. त्यांचा जन्म २३ जून, १९०६ रोजी मध्य प्रदेशात झाला होता. असहकार चळवळीत सामील झाल्यावर ते प्रसिद्धीस आले आणि लवकरच त्यांना इंग्रजांनी अटक केली. जेव्हा त्यांना दंडाधिकार्यांसमोर हजर केले असता, त्याने त्याचे नावआझादअसे ठेवले, वडिलांचे नावस्वातंत्र्य़”. नंतर त्यांनी अशी शपथ घेतली की आपल्या आयुष्यात ते कधीही अटक होणार नाहीत आणि मुक्त आत्म्याप्रमाणे मृत्यूला मिठी मारतील. 27 फेब्रुवारी 1931 रोजी ब्रिटिशांशी झालेल्या युद्धाच्या वेळी जेव्हा त्यानी स्वत: ला गोळ्या घातल्या तेव्हा त्यानी त्यांच्या प्रतिज्ञेच्या प्रत्येक शब्दाचे पालन केले.

दुश्मन की गोलियों का हम सामना करेंगे, आजाद रहे हैं, आजाद ही रहेंगे! (आम्ही आमच्या शत्रूंच्या गोळ्यांचा सामना करू, आम्ही मुक्त आहोत, मुक्तच राहू)

शत्रूच्या गोळ्यांचा सामना करण्यास ते घाबरला नाहीत, परंतु त्यांच्या देशातील एकाने त्यांच्याशी दगा केला हे त्यांना माहित नव्हते. आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे की जवाहरलाल नेहरूंसोबत शाब्दिक चकमक झाल्यानंतर आझाद परत येत होते? ते आनंद भवनहून परत येत होते आणि आपले दुसरे क्रांतिकारक मित्र सुखदेव राज यांना भेटण्यासाठी अल्फ्रेड पार्कच्या दिशेने निघाले होते. आता याचा सरळसरळ अंगुलीनिर्देश नेहरूंकडे जातो. कारण नेहरूंचे अनेक ब्रिटिशांशी मैत्रीपूर्ण संबंध होते हे रहस्य नव्हते. नेहरूंच्या कट्टर देशभक्तीला कलंक लावण्यासाठी ही एक कथा रचली म्हटलं जाण्याची शक्यता जास्त आहे.

पण एकदा चंद्रशेकर आझाद यांच्या पुतण्याने काय म्हटले यावर लक्ष केंद्रित करूया. त्यांचे पुतणे सुजित आझाद म्हणाले होते की ते जवाहरलाल नेहरू यांनीच ब्रिटिशांना आझाद य़ांच्या ठावठिकाण्याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, आझाद यांनी नेहरूंकडे HSRAचा निधी सोपविला होता. (Hindustan Socialist Republican Association किंवा Army क्रांतिकारकांची संघटना. ज्याचे चंद्रशेखर आझाद हे संस्थापक होते आणि भगतसिंग यांच्यासह अनेक क्रांतिकारक या संघटनेचे सदस्य होते) आणि भगतसिंग यांना सोडण्याची विनंती केली होती. सुजित यांच्या मते नेहरूंनी पैसे स्वीकारले पण भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचे काय झाले हे आपल्या सर्वांना माहिती आहे. सुभाषचंद्र बोस यांच्यावर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नियमितपणे ब्रिटिशांशी गोपनीय माहितीची देवाणघेवाण केली, हे छुपे सत्य नाही. अलीकडेच हे उघड झाले होते की सुभाषचंद्र बोस यांच्या नातेवाईकांवर नेहरूंनी हेरगिरी केली होती. असेही म्हटले जाते की नेहरूंनी INA खजिना लुटणार्याला पुरस्कार देऊन गौरव केला. हे पाहून आपण आझादच्या ठायी ब्रिटीशांना माहिती देण्यास नेहरूंचा सहभाग नाकारू शकत नाही.

नेहरूंनी त्यांच्या आत्मचरित्रात पुष्टी केली आहे की चंद्रशेखर आझाद १९३१च्या सुरुवातीला अलाहाबाद येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यास आले होते. त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी नमूद केले आहे की फेब्रुवारी १९३१ मध्ये ते एका अनोळखी माणसाला भेटले आणि नंतर त्यांना कळले की ते चंद्रशेखर आझाद होते. पण हा त्यांचा धुर्तपणा होता आणि सत्य नाकारण्याचा प्रयत्न आहे. कारण आझाद कोण आहे हे जवळजवळ प्रत्येक भारतीयांना माहित होते आणि हि गोष्ट नेहरुंसारख्या देशपातळीवरील नेत्याला माहित नाही हे अशक्य आहे.नेहरू पुढे नमूद करतात कीआझाद यांना दहशतवादाबद्दल रस कमी झाला होता आणि शांततापुर्ण मार्गाचा अवलंब करायचा होता”. आता नेहरूंनी केलेले हे वाक्य अगदी चुकीचे म्हणणे आहे, कारण आझाद हे क्रांतिकारक स्वातंत्र्यसेनानी होते आणि नेहरू आणि gang यांच्या पाठोपाठ शांतता धोरण राबवण्याचा ते तिरस्कार करत होते. तर हे स्पष्ट आहे की नेहरूंनी त्यांच्या आत्मचरित्रातील तथ्ये विकृत करण्याचा प्रयत्न केला.

 

शेवटी नेहरू म्हणतात कीत्यांनी झाडाच्या मागे स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला; तिथे त्यांची ब्रिटिश पोलिसांबरोबर गोळ्यांनी झटापट झाली आणि गोळ्या घालण्यापूर्वी त्यानी एक-दोन पोलिस जखमी केले. ” होय, चंद्रशेकर आझाद यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले असा नेहरूंचा उल्लेख आहे. पण लहान मुलदेखील यावर विश्वास ठेवणार नाही. कारण हे सर्वश्रुत होतं कि, आझाद यांनी स्वत: वर उरलेली शेवटची गोळी झाडुन, इंग्रजांनी पकडण्याऐवजी मृत्यूला मिठी मारली.

 

तर आझाद यांना ठार करण्यात नेहरूंनी खरोखर इंग्रजांना मदत केली का? परिस्थितीजन्य गोष्टी अंगुलीनिर्देश करतात.  

 

Source: https://www.quora.com/Is-it-true-that-Chandrashekhar-Azad-was-returning-after-meeting-Nehru-when-he-was-surrounded-by-cops-at-alfred-park

http://www.dailyo.in/politics/chandrasekhar-azad-jawaharlal-nehru-mahatma-gandhi-hinduism-freedom-struggle-sardar-patel-subhas-chandra-bose/story/1/9233.html

 

 

 

 

 

 


Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...