पाऊस पडून गेला
पाऊस पडून गेला
तुझ्या आठवांचा
ओलावा सोडून गेला
पडले थेंब माथ्यावर
आठवण ती प्रीतीची
उतरून येई गालावर
प्रत्येक थेंब पाघोळी
अडकवून आठवबेडी
पडतात पायाजवळी
अंगण सारे भिजले
वेड्या काळोखात
डोळ्यात सागर जमले
उरलो एकटा आता
आठवण होती जवळी
भिजवून पाऊस गेला
त्या उनाड थेंबानाही
तो कैफ आठवांचा
अडवू शकला नाही
आकाशी उरले होते
आता नुसतेच मेघ
आठवात भिजले होते
आठवात भिजले होते
©® कवी : प्रसन्न आठवले
१४/०७/२०२०
०७:५४
Comments
Post a Comment