डोळ्यात नशा तव प्रेमाची
आतुर जीव हा भेटीला
येता अंधुक तव चाहूल
जीव कल्पनेत सुखावला
चहूकडे दिसे तव प्रतिमा
अन जीवास आस तुझी
सखये या तिन्हीसांजेला
तूच असावी, सय न तुझी
का उगाच वाटे मनास या
भेटणे कधी होईल आता
तुजविण व्यर्थ हे जगणे
एक झलक तरी ये आता
हे जीवनचित्र तुजभवती
जणू अवनिभवती हा चंद्र
दिवसा ही याद सतावे परी
जाई ना क्षण क्षण ही रात्र
येसी आता आतुर प्राण
भेटीचे योग जुळून यावे
येसी अचानक वाटे अन
चांदणे प्रीतीचे फुलवावे
चांदणे प्रीतीचे फुलवावे
©® कवी : प्रसन्न आठवले
१५/१०/२०१९
०८:३९
Comments
Post a Comment