मदनिका जशी इंद्राघरची
तव प्रतिमा मज दिसे तशी
या नाजूक चंचल देहाला
खुलून दिसे ती खळी तशी
प्रीतीचे सखये भरते यावे
ऐसी दिसती तव लोचने
भासती मनाला या ऐसें
मोहून घेती आकर्षाने
किती लिहावे तुजसाठी
हे शब्द तोकडे पडतात
तव प्रशंसेस ग मधुराणी
वाक्यांचे पथही अडतात
या शब्दांना यावी शक्ती
स्तुती ऐसी तव करण्यास
चेहऱ्यास पाहुनी चंद्र सखी
घायाळ भेट तव घेण्यास
©® कवी : प्रसन्न आठवले
१५/१०/२०१९
Comments
Post a Comment