Skip to main content

मुरली - १६

(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)

मुरली  - १६

सर्व व्यवस्थित आहे याची, खातरजमा करून सर्व रथ, घोडे गाड्या आणि सर्व साजसामान पुन्हा द्वारकेच्या दिशेने रवाना झाले. कृष्ण राहून राहून आपल्या रथात ठेवलेल्या उंची वस्त्रात बांधलेल्या त्या भेटवस्तूंच्या वेष्टनांकडे  मधून मधून बघत होता. त्यामुळे दादा काय बोलत होता याकडे थोडस दुर्लक्षच होत होतं आणि दादाच्या प्रत्येक वाक्यागणिक हं , हो , नाही इतकं त्रोटक उत्तर कृष्ण देत होता. दादाच्या ही गोष्ट लक्षात आली आणि म्हणून त्याने प्रश्न केला.

"कान्हा अरे मी काय विचारतोय हे न ऐकताच हं , हो, नाही इतकीच उत्तर देतोयस. लक्ष नाहीये तुझं."

कृष्ण चतुराईने म्हणाला

"दादा तुम्ही जेंव्हा कृष्ण या ऐवजी कान्हा म्हणता, तेंव्हा अंगावर रोमांच उभे राहतात आणि पटकन बालपणीचा काळ समोर उभा राहतो. मी स्वतःला खूप धन्य धन्य समजतो कि, मला लहान भाऊ म्हणून जन्म मिळाला. अन्यथा तुमच्या इतक्या जबाबदाऱ्या इतक्या सहज पेलणं हे खरंच अवघड काम होत. आपण ते लीलया पेलता. आणि पुन्हा योग्यवेळी मला समजावणं,कधी रागे भरण ,  घर आणि बाहेर  सर्व ठिकाणी लक्ष देणं राजकारण, पुन्हा तुमची रोजची तालीम हे सर्व कधी कधी स्वप्नवत वाटत. मी हे इतकं सर्व करू शकेन असं वाटत नाही. म्हणून तुम्ही ज्येष्ठ बंधू आहात या कल्पनेने मी अगदी सुखावतो आणि सुरक्षित पण वाटत. "

बलरामदादा थोड्या खुशीत विचारतात

"का वाटत"

"दादा प्रश्नच नाही मी या युगातील आणि विश्वातील सर्वश्रेष्ठ गदाधारी योध्याचा कनिष्ठ बंधू आहे.  केवढा मान आहे हा माझ्यासाठी. "

"बर असूदेत ते. तुला वाटत ना कौतुक माझं, मलाही त्यात आनंद आहे. पण तरीही तुझं लक्ष का नव्हतं ते नाही सांगितलंस. "

"तस काही नाही. पण या नक्षीदार वेष्टनात काय आहे हि उत्सुकता मनाला स्वस्थ बसू देत नाही. "

"तसाही तू चंचल आहेसच भारी. बघ उघडून काय आहे ते. तू द्वारकेला पोहोचे पर्यंत स्वस्थ बसणार नाहीस आणि बसू  देणार नाहीस. "

"धन्यवाद दादा. असा ज्येष्ठ बंधू सर्वांना मिळो. किंबहुना मी तर म्हणेन ज्येष्ठ बंधू आपल्यासारखाच असुदे या पुढे, सर्वांचा. "

"बर स्तुती पुरे झाली, आधी बघ "

"हो"

असं म्हणून कृष्णाने त्वरित ते नक्षीदार वेष्टन हातात उचलून घेतलं. त्याला उंची अत्तराचा सुवास येत होता. कृष्णाला आणि बलराम दादाला खूप कौतुक वाटलं ही भेट देणाऱ्या  गावकऱ्याचं . कृष्णाने ते वेष्टन उघडायला सुरवात केली. त्या उंची वस्त्राचे एक एक पदर उलगडताना कृष्णाच्या अंगावर रोमांच उभे राहात होते मन प्रफुल्लित होत होतं. कारण कदाचित त्यात काय आहे हे त्याने आधीच जाणलं होत आणि काय असावं या कल्पनेने मन आधीच कल्पनातीत आनंदात रममाण झालं होत.

करता करता सर्व पदर उलगडून झाले आणि समोर असलेल्या  त्या  भेटवस्तूं पाहून मन अगदी हरकून गेलं. काय करू आणि काय नको असं झालं होत कृष्णाला. दादा तर कृष्णाच्या चेहऱ्यावरील हावभावाकडे निरखून पाहात होता. त्याला आता सुद्धा कृष्णात बालपणीचा नटखट कृष्ण दिसत होता. त्या दृश्याला पाहून. स्वये जगदीश्वरालासुद्धा आपले जुने दिवस आठवले. कृष्णाने त्याच भारावलेल्या अवस्थेत दादाकडे बघितल. दादा सुद्धा कृष्णाकडे पाहात होता. अलौकिक , अपरिमित, असीमित, अत्युच्च आणि अनमोल आनंदाची  ती पर्वणी. ज्येष्ठ बंधू कनिष्ठ बंधूंच्या आनंदाने आनंदित, कनिष्ठ बंधू आपल्या वरील ज्येष्ठ बंधूंच्या प्रेमाने आनंदित. अवर्णनीय अश्या दृश्यात समस्त जगत , काळ , परमात्मा , शेष आणि चराचर रममाण झालं.

परमात्म तत्व असलेल्या पण मानवी देह धारण केलेल्या जगत्पित्याला त्या वेष्टनातील भेटी बघून स्वर्गसुख यःकश्चित वाटायला लागलं. अपार ममतेने त्या भेटीकडे एकटक बघत असलेल्या कृष्णाला डोळ्यातील अश्रू अनावर झाले. दोन्ही डोळ्यातून आनंदाश्रू ओघळताना, प्रत्यक्ष नारद आकाशास्थ  हे दृश्य बघत आहेत. त्यांनाही अश्रू अडवणं अशक्य होत. त्यांनी वरूनच प्रसन्न प्रणिपात केला आणि   म्हणाले कि,

"हे मायाकार स्वयं त्याच मायेत अडकून अलौकीक आनंदाचा अनुभव घेत आहात आणि आम्ही इथून त्रयस्थ म्हणून बघायचं. किती हा अन्याय. किती छोटीशी गोष्ट पण अपरिमित आनंद देऊन गेली प्रभुना. आणि मी सुद्धा किती भाग्यवान कि हे दृश्य याची देही याची डोळा बघायला नेमका इथेच आलो. धन्य आहात जगत्पिता . धन्य आहात. "

इकडे रथात कृष्णाला आनंदाश्रूंच्या आधींन पाहून पुन्हा दादाला अश्रू अनावर झाले. आणि प्रेमभराने दादा म्हणाले.

"कृष्णा अरे किती छोट्या गोष्टीत आनंद मानतोस कधी कधी, आणि कधी कधी तर तुझा हट्ट पुरवता पुरवता यशोदा मातेला जीव नकोसा होऊन जायचा. तू खरंच कल्पनेच्या पलीकडे आहेस आणि समजण्याच्याही पलीकडे. तुझ्या मनाचा ठाव कळिकाळाला सुद्धा लागणार नाही. मला तर ज्येष्ठ बंधू असूनही अजून तू समजून येत नाहीस. कधी वज्र असतोस तर कधी अगदी लोण्याचा गोळा, सहज वितळणारा. अद्भुत  आहेस तू. मी कधी तुला ओळखू शकेन. असं वाटत नाही. "

"दादा तस नाही. आनंद हा खूप चमत्कारिक गुणधर्म आहे. तो जितका पकडायला जावा,  तितका तो निसटू पाहतो. म्हणजेच तुम्ही जितका त्याला जवळ बोलावू पाहाल, तितका तो निसटून जाईल. हे अगदी शास्त्र आहे. मनाचं.  जस, मनाला जितकं नियंत्रित करण्याचा यत्न  कराल, तितकं ते सुटून जाण्याचा निश्चय करेल. म्हणूनच   आपण या निश्चयाच्या पाठी जाण्याचा अजिबात यत्न करू नये. आपण जगताना असेच छोटे छोटे आनंदाचे क्षण वेचत जावं. त्यांचा अद्भुत आणि अलौकिक आनंद मनात साठवावा. त्याचा साठा हाच पुढे तुमच्या मनाला त्या क्षणांच्या मागे येण्याची प्रेरणा देतो.  म्हणजेच आपल्यातील लहान मुलं आणि मनातील बालपण कायम जिवंत ठेवायच. त्याला सतत जाग ठेवायचं. ते लहान मुलंच आपल्या या आनंदाच्या पर्वणीत , स्वतःहून त्या अलौकिक क्षणी आपोआप मनातून डोकावत आणि मग मनाला त्यामागे यावच लागत. हे इतकं सोप्प आहे. जगण्याचा आनंद अश्याच छोट्या छोट्या गोष्टीत घ्यायचा. मोठ्या गोष्टी संमिश्र भाव देतात. पण हे छोटे क्षण जे आनंद देतात ना , तो शब्दातीत असतो. हा आनंद मला स्वर्गसुखाहून सुद्धा प्रिय आहे आणि म्हणून असा आनंद मिळवत जगणारे सुद्धा मला तितकेच प्रिय आहेत आणि असतील. "

"कृष्णा कधी कधी तू इतकं सुंदर कथन करतोस कि मन गुंग होऊन जात ऐकण्यात. बरेच वेळा कळत नाही. पण खूप काही सांगतोस हे जाणवत. असाच रहा कायम. "

"दादा अहो हे सुद्धा तुम्ही आहात मागे म्हणून, विनाचिंता करू. शकतो. "

यावर दादांनी कृष्णाची पाठ कौतुकाने थोपटली आणि म्हणाले

"कृष्णा असा वागलास आणि बोललास कि, मला कधी कधी वैषम्य वाटत. "

"कशाचं दादा आणि का "

© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...