गुरुकृपा
त्याविण न श्वासही चाले
पाऊलही न हाले जडजीवाचे
ऐसे जो मानी मनास
उद्धार तयाचा होय या जन्मास
मानले आपुले या जगी जयास
सोडुनी जाती जगी एकटे सायास
म्हणुनी गुरुराज म्हणे कास धरावी
घ्यावी नाम काठी हाती आधाराची
एक एक क्षण वाया न जाऊ देणे
नामधर्म श्वासामाजी आहे चालविणे
उगाच न करणे प्रपंच जगाचा कोणी
तयासाठी जगदीश समर्थ आहे वाणी
स्वतःला उद्धारा पहा जग उद्धरेल
स्वःतास सुधारता पहा जग सुधारेल
आत्मप्रचिती ही मानावी जगी या
जन्म झाला मानवाच्या योनीत या
उगा न फिरणे उगा न बोलणे
करावे नाम नाम सकळ साधने
एक मार्ग गुरूंनी आहे सांगितला
कलियुगी आधार हाचि मानवाला
कलियुगी आधार हाचि मानवाला
© कवी : प्रसन्न आठवले
१८/०५/२०१८
०७:४५
Comments
Post a Comment