Skip to main content

गीत विश्लेषण : गीत ॥ श्रीरामचन्द्र कृपालु भजमन हरण भवभय दारुणम ॥भाग २

गीत विश्लेषण :  गीत  ॥ श्रीरामचन्द्र कृपालु भजमन हरण भवभय दारुणम ॥भाग २

श्री रामचन्द्र कृपालु भजमन हरण भवभय दारुणं ।
नव कञ्ज लोचन कञ्ज मुख कर कञ्ज पद कञ्जारुणं ॥१॥

कन्दर्प अगणित अमित छबी नव नील नीरद सुन्दरं ।
पटपीत मानहुँ तडित रुचि शुचि नौमि जनक सुतावरं ॥२॥

भज दीनबन्धु दिनेश दानव दैत्य वंश निकन्दनं ।
रघुनन्द आनन्द कन्द कोसल​ चन्द दशरथ नन्दनं ॥३॥

सिर मुकुट कुंडल तिलक चारु उदार अङ्ग विभूषणं ।
अजानु भुज शर चाप धर संग्राम जीत खरदूषणं ॥४॥

इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मन रंजनं ।
मम हृदय कंज निवास कुरु कामादि खलदल गंजनं ॥५॥

भक्ताला भगवंताचं दर्शन व्हावं हा योग भक्ताच्या भक्तीतील तन्मयतेवर लीनतेवर अवलंबून असतो. अर्थात प्रारब्ध , संचित आणि भाग्य हे देखील यात महत्वाचं असतंच हे नक्की. अनेक जन्मांच्या पूर्वपुण्याईवर या दर्शनाचा लाभ अवलंबून असतो. ते दर्शन होणं हे महत्भाग्य आणि असं दर्शन घडल्यावर या जन्मात काही करण्याचं राहात नाही. मुळात प्रत्यक्ष महर्षी वाल्मिकीं एक दिव्य महर्षी. एका सामान्य वाल्या कोळ्याचा एक महर्षी होतो हे योग्य अनुसंधान, साधना, तपश्चर्या, योग, चिकाटी याची प्रचिती व प्रत्यय आहे. 

ज्यावेळी पंचमहाभूत देहातील आत्म्याच्या उन्नतीचा काळ येतो त्यावेळी तो देह कोणत्याही अवस्थेत व जन्मात असला तरी विधाता कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्या आत्म्याला त्याच्या उन्नतीच्या मार्गाकडे घेऊन जातो. ज्याप्रमाणे वाल्या कोळ्याबाबत देवर्षी नारद यांच्या मार्फत त्या देहधारी दिव्य आत्म्याच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त झाला आणि रामनामाने एक कोळी महर्षी वाल्मिकीमध्ये परिवर्तित झाला. 

नामाची अशी अद्भुत अनुभूती अनेक देहधारी मानवांनी घेऊन उन्नती साधली आहे. रामायणकार या पदावर आरूढ होऊन झालेल्या व प्रत्यक्ष प्रभूंच्या जन्माआधी एक सहस्त्र वर्ष रामायण निर्मिलेल्या महाकवी वाल्मिकींनी प्रत्यक्ष महालक्ष्मी अवतारातील माता सीतेला आपल्या आश्रमात स्थान देऊन कुश आणि लव या प्रभूंच्या अंशाना सांभाळण्याचं महत्कार्यदेखील केलं. 

अशी दिव्य अनुभूती घेऊन तृप्त झालेले महर्षी पुन्हा तुलसीदास या मानवी देहात अवतीर्ण होऊन पुन्हा नामसाधना करून त्या दिव्यत्वाला प्राप्त करण्याचा योग साधतात, त्यावेळी या कार्याची आवश्यकता काय हा प्रश्न मनात निश्चित येतो. तीच गोष्ट रामदासस्वामी व अनेक दिव्य विभूतींविषयी. सर्वसामान्य माणसाच्या जीवनाची इति कर्तव्यता आणि संत महंतांच्या जीवनाची इतिकर्तव्यता हि नक्कीच भिन्न असते.  

समाजात धर्म संस्कृती यांचा ऱ्हास होण्यास सुरवात होते अथवा त्यांचा प्रभाव कमी होऊ लागतो किंवा श्रद्धा क्षीण होत जाते त्यावेळी श्रद्धा , संस्कृती धर्म आणि कर्म यावर लोकांचा विश्वास पुनः प्रस्थापित करण्यासाठी असे पवित्र आत्मे देह धारण करून कष्ट काळज्या झीज सहन करून श्रद्धा भक्ती यांच्या जोरावर मानव उच्च स्थान प्राप्त करू शकतो हे सिद्ध करतात. हीच त्यांच्या जीवनाची इतिकर्तव्यता असते. 

आता उद्यापासून या अलौकिक प्रार्थनेचा अर्थ जसा समजेल तसा जाणून घेऊ. या कार्यात मार्गदर्शनार्थ स्वतः गोस्वामी तुलसीदास, रामभक्त हनुमान आणि स्वतः प्रभू रामचंद्र आहेतच. 

।। श्रीराम जयराम जय जयराम ।।

क्रमशः 

©® संकल्पना आणि लेखक : प्रसन्न आठवले. 
२०/०९/२०२०

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...