प्रतिभेचे देणे
मी प्रतिभेचे देणे तूजला पुन्हा मागतो
शारदे तुला वन्दितो तूला प्रार्थितो
शारदे तुला वन्दितो तूला प्रार्थितो
हे गजवदना हे गणराया हरसूता मोरया
आता दे मज शब्द सम्पदा माथा ठेवितो
लाख चूका घ्या उदरामाजी हे दीन घना
गौरीसूता हे तू स्वामी तूजला प्रार्थियतो
विद्येचा तू धाता तू तर आद्य प्रदाता
दे मज ठायी शब्दखाण ती हर हर ओमकारा
तूझ्या वीना ही वाणी मूकच मुषकवाहना
शरदातिरि तूझ्या मंदिरि दास मी आहे तूझा
हेदेवी तू कृपावंत हो स्फूर्ति सूधा हो जरा
करुनी वंदन ठेवूनि मस्तक तव चरणी माते
तूझ्या कृपेचा प्रसाद देसी विश्व तूझे भासते
तू असशी तर जिंकून घेईन शब्दांची जननी
आता ठेवून मस्तक पायी रुधिरार्पण करितो
आता विनवूनी तूज चरणावर एक मागणे गातो
सारे जीवन अर्पीन काव्या साठी मी माझे
सारे जीवन अर्पीन काव्या साठी मी माझे
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment