पराग कथन
फूलाफूलातील पराग बोले
जन्मच माझा पूनर्निर्मिण्या।।
इतूके माझे काम असे की
जन्म जगी या पुन्हा जन्मण्या ।।१।।
कोणा आवडे फूल छान तर
कूणा तयातील रंग आवडे ।।
कुणी म्हणे हे नाजुक साजुक
कुणा तयातील गंध आवडे।।२।।
कूणा तयातील रंग आवडे ।।
कुणी म्हणे हे नाजुक साजुक
कुणा तयातील गंध आवडे।।२।।
कुणास वाटे वेणी करुया
माळू सुंदर केसातूनीया
कुणास वाटे गजरा करुया
घालू आणि सुंदर दिसूया ।।३।।
माळू सुंदर केसातूनीया
कुणास वाटे गजरा करुया
घालू आणि सुंदर दिसूया ।।३।।
पण हे माझे भाग्य जगी
याआनंदाला कारण मी रे
कुणा मिळाले असे भाग्य जे
लहान जन्मी महान मी रे ।।४।।
कुणा मिळाले असे भाग्य जे
लहान जन्मी महान मी रे ।।४।।
मला लाभला असा जन्म की
पुनः पुन्हा मी असा येतसे
ज्या योगाने जगण्या माझ्या
नवा नवा तो अर्थ येतसे।।५।।
पुनः पुन्हा मी असा येतसे
ज्या योगाने जगण्या माझ्या
नवा नवा तो अर्थ येतसे।।५।।
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment