श्रावण
हिरवाळीच्या गालीच्यातून
तृणपुष्पांची शाल पांघरुन
जलबिंदुची चादर ओढून
श्रावण आला बरसत बरसत ||
तृणपुष्पांची शाल पांघरुन
जलबिंदुची चादर ओढून
श्रावण आला बरसत बरसत ||
आकाशाच्या चारी दिशानी
निसर्ग आपुल्या अष्ट भुजानी
सोडून दिधल्या अनंत धारा
श्रावण आला बरसत बरसत ||
निसर्ग आपुल्या अष्ट भुजानी
सोडून दिधल्या अनंत धारा
श्रावण आला बरसत बरसत ||
नभो मंडळी दाटी झाली
मेघांची ती गर्दी जमली
वसुंधरा ही तृप्त जाहली
श्रावण आला बरसत बरसत ||
मेघांची ती गर्दी जमली
वसुंधरा ही तृप्त जाहली
श्रावण आला बरसत बरसत ||
ऋतुपर्व हे सुरु जाहले
लगबग लगबग सारे करती
दशोदिशाना हर्ष भरुनी
श्रावण आला बरसत बरसत ||
लगबग लगबग सारे करती
दशोदिशाना हर्ष भरुनी
श्रावण आला बरसत बरसत ||
आता सारे फुलले मोदे
रंगांचीही झाली उधळण
निसर्गातही अवघी धुंदी
श्रावण आला बरसत बरसत ||
रंगांचीही झाली उधळण
निसर्गातही अवघी धुंदी
श्रावण आला बरसत बरसत ||
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment