गीत गणेशायन १
प्रेममयी मूर्ती तू शशी विलसे माथा
रवीतेजची मुखमंडली बुद्धिचा दाता
ओमकारा साकारा त्रिगुणांचा धाता
कार्याचा आद्यची तू विघ्नांचा त्राता ।।
रवीतेजची मुखमंडली बुद्धिचा दाता
ओमकारा साकारा त्रिगुणांचा धाता
कार्याचा आद्यची तू विघ्नांचा त्राता ।।
सूर्य चन्द्र ग्रह तारे नक्षत्रे नभी विहरति
तव नामे दिन उगवे निशिकर संभ्राता
अवघे भूमण्डल तू त्रिलोकी महता
स्वामी तू सकलांचा मोक्षाचा दाता ।।
तव नामे दिन उगवे निशिकर संभ्राता
अवघे भूमण्डल तू त्रिलोकी महता
स्वामी तू सकलांचा मोक्षाचा दाता ।।
प्रेममयी मूर्ती …….
रत्नाचा मुकुटची तो शोभे तव माथा
वकृतुण्ड श्यामवर्ण वामे करी शुण्डा
तेजाची नेत्रे दो रिपु हो भयभीता
शूर्पकर्ण उच्चमती संकट संक्रांता ।।
वकृतुण्ड श्यामवर्ण वामे करी शुण्डा
तेजाची नेत्रे दो रिपु हो भयभीता
शूर्पकर्ण उच्चमती संकट संक्रांता ।।
प्रेममयी मूर्ती ……….
उदरी तू धारियले प्रमरूपे भक्ता
त्यावरी तो सर्प जणू भक्तभय रक्षा
तुंदिल तनु चपलचरण करी लिलये नृत्या
तव चरणी काव्य सुमन हर्षे स्विकार्ता ।।
त्यावरी तो सर्प जणू भक्तभय रक्षा
तुंदिल तनु चपलचरण करी लिलये नृत्या
तव चरणी काव्य सुमन हर्षे स्विकार्ता ।।
प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment