नवा दिवस
चला चला रे पून्हा नवा हां
आनंदाचा दिवस उगवला
प्राची वरती प्रभा उषेची
घेवून आला सूर्य उगवला ।।
आनंदाचा दिवस उगवला
प्राची वरती प्रभा उषेची
घेवून आला सूर्य उगवला ।।
उत्साहाचे सळसळ शिरवे
संचारुन फिरी येऊ द्या रे
दवात भिजल्या गवतावरचा
पायाना ओलावा द्या रे ।।
पुन्हा नव्या या दिवसाची ती
शक्ति घेवून जागे व्हारे
पुन्हा नव्याने कामा लागा
जुने कालचे सोडून द्या रे ।।
नैराश्याचे रंग गळाले
जाणा गेला राजनीनाथची
आता आला दिन सोन्याचा
पुन्हा उगवला सवितानाथही ।।
सारे सारे काळोखाचे
राज्य संपले सोडून द्यारे
नव्या दिनाच्या नव्या जगाच्या
गाण्या संगे ताल धरा रे ।।
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment