स्वातंत्र्य
मन आज तराणे गाई
तो दिन सोन्याच्या आला
हां देश गुलामी तोडून
निर्वेध स्वतंत्रची झाला ||
तो दिन सोन्याच्या आला
हां देश गुलामी तोडून
निर्वेध स्वतंत्रची झाला ||
त्या दिशा उजळल्या साऱ्या
त्यावेळी चंद्र नभाला
उच्चारव बोलत होता
हां देश स्वतंत्राची झाला ||
बलीदाने घडली अगणित
त्यासाठी लढले असतील
कितीकानी प्राणही दिधले
संसार उधळले असतील ||
रक्ताने वा रक्तावीण
तरी प्रयत्न सारे फळले
हे भाग्य आम्हा अर्थासह
स्वातंत्र्य काय ते कळले ||
या देशासाठी ज्यानी
गमवीले प्राणही आपुले
प्राचीवर उदयासाठी
रुधीरही सांडले आपुले ||
करू त्याना वंदन आपण
करू त्याना याद सदोदीत
लढले अन अमर जहाले
करू त्याना याद सदोदित ||
प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment