आज, ०८ सप्टेंबर, आशाताईंचा वाढदिवस त्या निमित्त लिहिलेली कविता. त्यांना आणि त्यांच्या गीतांना सहस्त्र वर्ष आयुष्य लाभो हीच परमेश्वराकडे प्रार्थना आणि अर्चना.
आशा मनातली
आशा स्फूर्तितली
आशा उल्हास देणारी
आशा आनंदमय
आशा हर्षदायी
आशा वेड लावणारी
आशा कारुण्यमय
आशा घनगंभीर
आशा दर्द जागवणारी
आशा आल्हाददायक
आशा उत्तान उन्मादक
आशा रतीमय करणारी
आशा अंतरातम्यांतील
आशा पारलौकिकातील
आशा तन्मयता देणारी
आशा सुगंधीत पुष्पांची
आशा कमलदलाची
आशा तरुलता फुलवणारी
आशा कित्येक भावना
मूर्तिमंत प्रकट करून
साक्षात समोर मांडणारी
© कवी : प्रसन्न आठवले
०८/०९/२०१८
०७:४४
Comments
Post a Comment