देव गजानन निघे घेऊनि
चारी दिशाना सुहास्य करुनि
भक्तांच्या हाकेला धावुनी
मूषक हा साथीला
मोरया येई भेटीला
मोरया येई भेटीला
करुनि तयारी स्वागत करूया
समर्पणाचा भाव वाहुया
पूजा विधी हे माध्यम धरूया
भक्ती अर्पूया चला
मोरया येई भेटीला
मोरया येई भेटीला
करुनी सोहळा दश दिनांचा
शड्रस भोजन नैवेद्याला
मोदक करुनी येती ललना
धुप दिप सजवूया
मोरया येई भेटीला
मोरया येई भेटीला
उदकाचे हे पात्र घेऊनि
ताम्हणपात्री तया कल्पूनी
एकादश या आवर्तनानी
वक्रतुंड पुजूया
मोरया येई भेटीला
मोरया येई भेटीला
दश दिशा या गेल्या हरकुन
जमूनी सोयरे घराघरातून
सद्भावे सहर्षित होऊन
मंगलमय होऊया
मोरया येई भेटीला
मोरया येई भेटीला
वर्ष सरले वाट पाहुनी
गजाननाला डोळे भरुनी
प्रेम त्याचे मनात भरुनी
लोटांगण घालूया
मोरया येई भेटीला
मोरया येई भेटीला
प्रसन्न करण्या मंगलमूर्ती
चिंतामणी हर्षावा म्हणुनी
आठवले ते शब्द मांडुनी
कवनाते गाऊया
मोरया येई भेटीला
मोरया येई भेटीला
© कवी : प्रसन्न चिंतामणी आठवले
०७/०९/२०१८
Comments
Post a Comment