क्षण परीक्षा बघणारे उत्तर सापडू नये म्हणून दूर पळणारे
क्षण अचानक काही अतर्क्य गोष्टी समोर घेऊन येणारे
क्षण सुखावणारे गार वाऱ्यासारखे
क्षण नाजूक अळवावरच्या पानासारखे
क्षण गुलाबी मधाळ स्पर्शासारखे
क्षण बोचणारे तीक्ष्ण काट्याचे
क्षण टोचणाऱ्या दुःखी वाट्याचे
क्षण द्विधा मन करणाऱ्या फाट्याचे
क्षण सावध वाट चालणारे
क्षण क्षणात वाट चुकणारे
क्षण पावलात अडखळणारे
क्षण निरागस हास्यासारखे
क्षण भुरभुरणार्या केसांसारखे
क्षण शांत मंद वाऱ्यासारखे
क्षण अचाट सामर्थ्य सांगणारे
क्षण अचाट गोष्टी करणारे
क्षण करून वाऱ्यावर विरणारे
अश्याच क्षणांचा समुच्चय आयुष्य आहे, क्षणच सांगणारे
हे क्षणच, क्षणात घडलेलं विसरून पुढे जायला लावणारे
© कवी : प्रसन्न आठवले
०७/०९/२०१८
२३:४८
Comments
Post a Comment