निश्चय
निश्चये ती चालली ध्येये तिच्या त्या शांतवाटे
चालताना ठेच ती लागून काटे ते बोचलेले ।।
ध्येय साधेसेच होते अन् किती ते सनुलेसे
घर तिचे होते परी त्या सारख्या हलतात भिंती ।।
अन् उन्हें ती तापलेली येती कवाडे लांघुनिया
पण तिला ठाऊक नाही लक्ष्य ते जवळी असावे ।।
पाऊले ती थांबली नसतील तर ती पोचलेली
हे तिला सांगून पुन्हा थांबना वाटेमधे तू ।।
येऊनी तू पोचलेली लक्ष्य ते जवळी तुझ्या ते
पूर्ण ती होई तपस्या हे तुझे जे ध्येय आहे
गाठले ते ध्येय तू जवळी तयाच्या पोचलेली ।।

कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment