ख्वाब हो तुम या
चाल : ख्वाब हो तुम या कोई हकीकत कौन हो तुम बतलाओ
स्वप्न तू असशी की सत्याचा भास हे काही कळेना
माझ्या मनीच्या तारा छेडूनि जाऊ नको तू ये ना ।।धृ ।।
माझ्या मनीच्या तारा छेडूनि जाऊ नको तू ये ना ।।धृ ।।
या मनी प्रीत तू होउनि ये प्रिये
उल्हासे हे भासे सारे हे जग खुळे
स्वप्न तू ...
उल्हासे हे भासे सारे हे जग खुळे
स्वप्न तू ...
ये ज़रा साद मी घालितो राणी ये
एकांति ही प्रीति आपण ही फुलवू ये
स्वप्न तू ...
कवी: प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment