प्रेम गीत
गुन गुन गुन गुन भ्रमर गुंजतो
मन गीत मधुर प्रेमाचे गाते ||
धुंद दिशा मोहरल्या साऱ्या
आसमंत प्रेमातच विरते ||
या रंगीत रेशीम इंद्रधनूच्या
रंगात रंगल्या कळ्या पाकळ्या ||
मंद स्मित तव घेऊन आला
आला तव आठव तो आला ।।
रंगात रंगल्या कळ्या पाकळ्या ||
मंद स्मित तव घेऊन आला
आला तव आठव तो आला ।।
तूझ्या जाहल्या जाणवल्या मज
चेहर्यावर रेषा बावरल्या ।।
मज घेऊन जा प्रिया जिथे ती
दशोदिशा का असुसलेल्या ।।
चेहर्यावर रेषा बावरल्या ।।
मज घेऊन जा प्रिया जिथे ती
दशोदिशा का असुसलेल्या ।।
ओढ़ मना जाणवते भासे
तूज पाशी ती घेऊन जाते ।।
फूले शहारा अंगावर तो
धुंद चांदणे होऊन जाते ।।
तूज पाशी ती घेऊन जाते ।।
फूले शहारा अंगावर तो
धुंद चांदणे होऊन जाते ।।
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment