कृष्णसखा
तो कृष्णसखा राधेला विनावितो मनी
मी वाजवितो मुरली तू मुग्ध हो मनी
मी वाजवितो मुरली तू मुग्ध हो मनी
या गोकुळास सोडुनि जाऊ ये वनी
मी वाजवितो मुरली तू मुग्ध हो मनी
चल वृंदावनी छेड़ितो मी स्वर सुधा मनी
या धुंद वनी होऊ मुक्त भान सोडुनि
मी करितो तुज मुग्ध जाऊ भान हरपुनी
तुज आवाडीलें ते देईन स्वर मी ओतूनी
या बासरीचे वेड सखे लागले जनी
तरी तव प्रीति यावरी ही ख़ास साजणी
तू एक प्रिये माझी ही माझी मोहिनी
जरी या जगात प्रीति तव न पाहिली कुणी
तू तन माझे जाहलो तव आत्म होउनि
या भोगच्या पलीकडले राहु तत्व होउनी
कवी: प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment