Skip to main content

देवकी - २

देवकी -२

ज्येष्ठ भ्राता कंस  प्रथमपासून रागीट , महत्वाकांक्षी आणि सत्ता मिळवून ती राबवण्यात नव्हे तर काबीज करून आपल्या कह्यात ठेवण्याची मनीषा बाळगून असलेला. कित्येकदा त्यांच्या मनाचा थांग लागत नसे. त्यामुळे त्याने प्रथमपासूनच सैन्य, सैनिक आणि राजकीय बाबीत त्याने आधीपासून लक्ष घातले, नव्हे तर तो त्याचसाठी जन्माला आला असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.

अर्थात ही त्याची बाजू राजकीय व राज्यशासनाच्या दृष्टीने सुयोग्य असेलही. कारण आम्हा सर्व भगिनींना त्यात कधीही पडावे लागले नाही. किंबहुना त्या क्षेत्राशी आमचा कधी संबंध येऊच दिला गेला नाही. पण कुटुंबात म्हणाल तर सर्व भगिनी त्याला प्रिय. पण सर्वात जास्त प्रिय जर काही असेल तर ते म्हणजे मी अर्थात देवकी. मी काही म्हटलं आणि ते मला मिळणार याची पूर्ण दक्षता कंस स्वतः घेत असत.

अश्यातच पिताश्रीनी आणि काकाश्रीनी मिळून यदुवंश अर्थातच यादवांचे राजे श्री वसुदेव यांच्याशी माझ्यासह माझ्या सर्व सहा सख्यख्या भगिनी अर्थात श्रुतीदेवी , यशोधरा, श्रुतिश्रवा, श्रीदेवी, उपदेवा, सुरूपा आणि सातवी अर्थात मी म्हणजे देवकी यांचा विवाह करण्याचे योजिले. अर्थातच यादवघराणं हे त्याकाळातील प्रख्यात , शूर अनुपमेय, बुद्धिवान, बहुश्रुत आणि नितीवान घराणं म्हणून गणलं जात असे. यांच्याबद्दल म्हणजेच यादवराज श्री वासुदेवांबद्दल मीच काय सांगायचं. पण तरी सांगते.

भरदार आणि सुडौल देह, कांती सतेज, वर्ण सावळा, डोळ्यात शांत पण निश्चयी स्वभावाची झलक, पाणीदार नेत्रपटल, समोरच्याला फक्त नजरेतूनच जिंकून घेण्याचे भाव, अष्टावधानी, त्यामुळे हजरजवाबी आणि आपल्या धीरगंभीर, शांत चेहऱ्यावरील सूक्ष्म रेषादेखील, नव्हे तर बिंदू देखील न हलू देता समोरच्या व्यक्तीच्या हृदयाचा मस्तिष्काचा ठाव घेणारी वचनं आणि भाष्य करणारे मनोहारी व्यक्तित्व असणारे असे यादवांचे चहेते आणि यादवांमध्ये प्रेमाचा धाक असणारे आहेत.

खर तर मला त्यांच्या या स्वभावाचा प्रारंभी भारी राग येत असे.

भाग २  समाप्त .......
क्रमशः

© संकल्पना मांडणी व लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...