अभद्र युतींचा इतिहास आणि काँग्रेस !!
एकूणच काँग्रेसचा गतइतिहास आणि आघाडीतील सम विचारी पक्ष सोडून इतरांशी केलेल्या युती यांचा अभ्यास केला तर त्यांनी अश्या युतींचा उपयोग आपलं अस्तित्व, वैभव वाढवून अश्या अभद्र युतीतील भागीदार पक्षाचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठीच केला आहे. म्हणून साधारण सहा महिन्यात या अभद्र युतीचा चोथा होऊन सेनेला लोटा मिळणार हे नक्की.
गत इतिहासात दोन मोठी उदाहरणं आहेत एक चौधरी चरणसिंग आणि चंद्रशेखर. त्यातील चरणसिंग यांना तर बहुमत सिद्धही करू न देता लगेचच पाठिंबा काढून त्यांना औटघटकेचं पद मिळवून दिलं. उद्देश एकच, जनता पक्ष फोडणे. चंद्रशेखरांना दिलेला पाठिंबा एका क्षुल्लक कारणावरून काढून घेतला. त्यांचा उपयोग व्ही पी सिंग यांचा जनता दल पक्ष संपवणे यासाठी केला गेला. इतिहासानुसार आजघडीला दोन्ही पक्षांनी शकलं शकलं झाली आणि जनता पक्ष तर पूर्ण संपला.
काँग्रेस हा पक्ष याही वेळी या युतीचा उपयोग आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीच करेल. पण ते हे देखील जाणतात की, जितका जास्त काळ सेना सत्तेत राहील तितकी त्यांच्या इतर राज्यातील मतांवर परिणाम होतील. एकमात्र नक्की , जितका वेळ ही अभद्र युती टिकेल , तितका काळ तिघेही आपली अनेक वर्षांची भूक भागवण्यासाठी करतील. अर्थातच त्याचा राज्याच्या तिजोरीला आणि पर्यायाने जनतेला त्रास होणार हे निश्चित.
असो आता सेनेनेच आपलं अस्तित्व व्यक्तिगत महत्वाकांक्षेपायी पणाला लावायचं ठरवून , इतक्या जुन्या युतीचा त्याग करायचं ठरवलं असेल तर त्याला कोण काय करणार !
बाकी देखते रहो. पण सहा महिन्यांच्या आत निवडणुकीला तयार रहा. कारण काँग्रेसचा इतिहास यास साक्षी आहे.
©® प्रसन्न आठवले
११/११/२०१९
Comments
Post a Comment