ll रुद्रस्तुती ll
आता व्हावे रुद्रध्यान
जप जप शिवाचे नाम
आता व्हावे रुद्रध्यान
ओंकार हा त्रिशूळधारी
शिवनाम भवदुःख हारी
करा मोक्षप्राप्ती अर्चन
जप जप शिवाचे नाम
भस्मलेपीयले सर्वांगा
शिरी धारियली गंगा
त्रिशूळ डमरू स्वजन
जप जप शिवाचे नाम
उद्धरले जन जन युगे
पर्वतीसह शिव विराजे
बेलपत्री प्रिय शिव मान
जप जप शिवाचे नाम
शिवनाम भयनाशक
भूत पिशाच्चे भजत
कैलास जयाचे स्थान
जप जप शिवाचे नाम
जाणतो तत्व शिवभक्त
प्रसन्न होता देई सहस्त्र
वृषभेश्वर हा हर हर
जप जप शिवाचे नाम
मायापाश सोडवतो
भक्तरक्षणी धावतो
त्रिभुवनी धाक जाण
जप जप शिवाचे नाम
वाहतो ही शब्दवेल
स्तुतिरुप कवनफुल
चरणी घ्यावे न्यून
जप जप शिवाचे नाम
©® कवी : प्रसन्न आठवले
०४/११/२०१९
Comments
Post a Comment