राजकारण हा शह काटशहांचा गेम
आज जो राजा उद्या त्याचा काय नेम
प्रामाणिकता गुंडाळून ठेवावी लागते
इथे फक्त जेत्याला नमन करावे लागते
पडद्यामागचे खेळ प्रत्येकावरच नेम
राजकारण हा शह काटशहांचा गेम
शत्रू मित्र सर्व तुमच्या आमच्यात असतं
उगाच भांडणात गुंतून राहायचंच नसतं
प्रत्येक दिवस इथे कधीच नसतो सेम
राजकारण हा शह काटशहांचा गेम
वजीर बरेच वेळा शत्रूशी करतो तह
आपल्याच राजाला देऊ शकतो शह
हुशार राजाही करेल वजीराचा गेम
राजकारण हा शह काटशहांचा गेम
इथे घोंगडी भिजत ठेवणं राजकारण
डोळ्याने इशारे करणं हे ही राजकारण
चारित्र्यवान रडती निलाजऱ्यांना फेम
राजकारण हा शह काटशहांचा गेम
मित्र मित्र म्हणत कोणी खंजीर मारतात
मित्राला दूर करून वैऱ्याला पूजतात
इथे स्वकीयांचाही नसतो काहीच नेम
राजकारण हा शह काटशहांचा गेम
शेवटी ज्याची असते धूर्त चाल दूर नजर
त्याचाच बसेल तिर बरोबर निशाण्यावर
कमळपाकळी करेल धनुष्याचा गेम
राजकारण हा शह काटशहांचा गेम
जो जिंकला तोच इथे श्रेष्ठ आणि थोर
हरला त्याला उचलायला मिळेना दोर
केवू लाग्यू , बे गुजरातीयोनो गेम
राजकारण हा शह काटशहांचा गेम
©® कवी : प्रसन्न आठवले
१२/११/२०१९
Comments
Post a Comment