मराठी हनुमान चालीसा
॥श्री गणेशाय नमः॥
आपदामप् हर्तारम् दातारम् सर्व संपदाम्॥ लोकाभीरामम् श्रीरामम् भूयो भूयो नमाम्यहम् ॥
-----------------------------------------------------------------------
हनूमान जनासोनूः वायूपुत्रो महाबलाः रामेष्ठा फाल्गूनशताः इन्द्राक्षो अमीत विक्रमः
उदविक्रमणस्येव सीताशोकविनाशकाः लक्ष्मणप्राणदाचं दशग्रीवस्यदर्पाः॥
द्वादश इतानी नामानी कपींद्रस्य महात्मनः स्वापकाले पठेत् नित्यम् यात्राकाले विशेषताः॥
तस्य म्रुत्यु भयम् नास्ती सर्वत्र विजयी भवेतं॥
----------------------------------------------------------------------
ll श्री हनुमाना गुरू मानून चरणी इह पर साधा जाऊन शरणी ll
बुद्धीहीन तन कलीरत हे मन स्वीकारून हे सत्य मी शरणी l
ll श्री हनुमाना गुरू मानून चरणी इह पर साधा जाऊन शरणी ll ध्रु ll
जय हनुमंत ज्ञानी गुणी वंदिती जय पंडित त्रिलोक पूजिती l
रामदूत अतुलनिय बलधामी अंजनिपुत्र पवनसुत नामी l
उदयाचली मधुर फल रवी मानून लीला दाविसी जगती l
कांचन वर्ण विरागी वेषी कुंडलं मंडित कुंचित केषी ll १ll
ll श्री हनुमाना गुरू मानून चरणी इह पर साधा जाऊन शरणी ll ध्रु ll
राम सुग्रीव ही मैत्री तू जमवी मिळवून दिधली राज्य पदवी l
जानकीपती देऊन मुद्रिका जल उल्लंघुनि जासी तू लंका l
सूक्ष्मरूप धरी सीता शोधिसी विकटरूप धरी लंका जाळीसी l
भीमरूप तू असूरा मारुनी रामकार्य संपूर्णा नेसी ll २ll
ll श्री हनुमाना गुरू मानून चरणी इह पर साधा जाऊन शरणी ll ध्रु ll
माता सीता शोकाकुल ती रघुवीरांचा शब्द तू नेसी l
सहस्त्र संकटे जरी या मार्गा प्रभू हे नेतील तडीस कार्या l
वानरसेना देसी चेतवून लंकेशाचा क्लेश वाढवून l
शोध शोधूनी शक्ती योजूनी युक्तीसह असुरांना ताडूनी ll ३ll
ll श्री हनुमाना गुरू मानून चरणी इह पर साधा जाऊन शरणी ll ध्रु ll
लक्ष्मण मूर्च्छित दुःखी श्रीराम संजीवनीसह वाचवी प्राण l
अस्त्र घेऊनी दोन्ही भ्राता वेचून असुरा नेती अस्ता l
अंती रामा बाणाने जरी रावण वध हा केला तरीही l
मोही न पडता रामा वचना लंका राज्या देसी विभीषणा ll ४ ll
ll श्री हनुमाना गुरू मानून चरणी इह पर साधा जाऊन शरणी ll ध्रु ll
सीताराम हे राज्या बसले हार देऊनी तुज गौरविले l
पाहुनी भक्ती जन नी अधिपती साश्रूंनयने धरा सजविती l
रामसीतेची सुंदर प्रतिमा त्वरित दाविसी आपुल्या हृदया l
रामचरित कर्णामृत गाऊनी रामनाम रसामृत पाजूनी ll ५ ll
ll श्री हनुमाना गुरू मानून चरणी इह पर साधा जाऊन शरणी ll ध्रु ll
जगदऊद्धारक कार्य करण्या कठीण कार्या सुगम करण्या l
कलियुगी सुख हे जाता शरण महाराष्ट्री जन करिसी रक्षण l
रामद्वारी तू ठाकसी ऐसा ब्रम्हादिका धाक हा कैसा
भूत पिशाच्च शाकिणी डाकिणी भयभीती तव नाम घेऊनी ll ६ ll
ll श्री हनुमाना गुरू मानून चरणी इह पर साधा जाऊन शरणी ll ध्रु ll
वज्र तनू अन ध्वजा विराची गदाधरा तू मूर्त बळाची l
ईश्वरांश संपूर्ण पवित्रा केसरीपुत्र पावन गात्रा l
सनाकादिक ब्रम्हादी देवही शारद नारद आणि शेषही
यम कुबेर अभिमाने कवनी भजती तुजला कीर्ती गाऊनी ll ७ ll
ll श्री हनुमाना गुरू मानून चरणी इह पर साधा जाऊन शरणी ll ध्रु ll
भरतासम मानून भ्राता हृदयी स्थान रामाच्या तुजला l
साधूजना तू प्रेमे वंदिसी असुरांसाठी आसूड होसी l
अष्टसिद्धी ह्या प्राप्तही होती भक्तिमार्गी तुजला जे भजती
रामरसाचे अमृत पियुनि मृत्युंजय ते होती जगती ll ८ ll
ll श्री हनुमाना गुरू मानून चरणी इह पर साधा जाऊन शरणी ll ध्रु ll
आत्मनंद श्रीराम रंजनी जन्म जन्मीचे दुःख भंजुनी l
यक्ष किन्नरे रघुवर दास शिवशंकर प्रभुचे दास l
चिंतनी हनुमंताला ठेवून हरती दोष पाप परिमार्जन l
ज्या ज्या स्थळी हो राम संकीर्तन त्या त्या स्थळी मारुती नर्तन ll ९ ll
ll श्री हनुमाना गुरू मानून चरणी इह पर साधा जाऊन शरणी ll ध्रु ll
श्रद्धेने गती साऱ्या साधती शुभफल कलियुगी पापे जळती l
भक्तीने जे तव गान करती मुक्ती मिळे त्या गौरी साक्षी l
तुलसीदास हनुमान चालीसा प्राकृत लिहिले ही मम गुरुकृपा l
योग्य असे जे रामसीता कृपा न्यून असे तर दोष हा माझा ll १० ll
ll श्री हनुमाना गुरू मानून चरणी इह पर साधा जाऊन शरणी ll ध्रु ll
मंगल आरती हनुमंताची सीता राम लक्ष्मण कृपेची ll
हा अंतरात्मा मिळुदे अनंता साधे अंता रे रे हनुमंता ll
॥जय श्रीराम॥
॥जय हनूमान ॥ ॥जय हनूमान ॥ ॥जय हनूमान ॥ ॥जय हनूमान ॥ ॥जय हनूमान ॥ ॥जय हनूमान ॥
© हनुमंत कृपेने कवन : प्रसन्न आठवले
२५/०३/२०१९
Comments
Post a Comment