ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ८
.
या सर्व तयारित आणि उत्सवाच्या धुंदीत हनुमान प्रभुंचा निरोप घेऊन आयोध्येकडे प्रस्थान करते झाले. कारण प्रभुना भ्राता भरताची निष्ठा पूर्ण माहित असते आणि म्हणून तेही चिंतेत असतात. यास्तव हनुमंताला पुढे धाडून निरोपाची व्यवस्था करण्यात आली आहे. हनुमंत तर क्षणाचाहि विलंब न लावता प्रभू आज्ञेची पूर्तता करण्यासाठी प्रस्थानार्थ झाले.
इकडे भरत क्षण क्षण आजच्या दिवसाची प्रतीक्षा करत आहे, पण मानवी मनाचाच हा सुद्धा अलौकिक गुण भरताला , प्रभुना, नव्हे समस्त अयोध्यावासीयाना प्रत्ययास येतो. १४ वर्ष सहज गेली पण आज एक एक क्षण हा युगासमान भासत आहे. भरत स्वयम संध्यासमयाची प्रतीक्षा करत असतानाच, वायुवेगाने आलेल्या हनुमंताच उद्दाण भरतासमोर येऊन समाप्त होत.
काहीसा अचंबित झालेला भरत एका क्षणात सावरून हनुमंताला ओळखतो आणि प्रसन्न प्रणिपात करतो. हनुमान त्यावर वाकून पाया पडायला जाणार तोच भरत त्याला अडवून म्हणतो
"सर्वश्रेष्ठ रामभक्ता ख़र तर मीच तुझ्या चरणावर मस्तक ठेवण योग्य आहे आणि तेच ज्येष्ठ भ्राता श्रीराम यानादेखील अपेक्षित असणार."
"भ्राता भरत अस का म्हणता आहात माझ्या हातून काही अपराध घडला असल्यास मी आपली क्षमा मागतो."
"नाही हनुमंता आपण तर ते पुण्यपुरुष आहात ज्याना श्रीरामांचा सहवास अखंड लाभला आणि जे प्रत्यक्ष्य प्रभुंचे श्वास आहेत. मी अभागी त्यावेळी मातुलगृही जाऊन विश्राम करत होतो जेंव्हा मातेने त्याना ........(एक दीर्घ श्वास घेऊन ) मला पामराला त्यांचा वियोग प्रारब्धी आला. नककीच माझे शतजन्माचे पापकर्म त्याच वेळी फलरूपात मजसमोर उभे ठाकले. (आणि एकदम भानावर येत) . क्षमा करा माझी अल्पमति क्षणिक कुंठित झाल्याने पूर्ण विस्मृत झालो. आपण खुप प्रवास करून आला असाल, मी आपल्या जलपनाचा प्रबंध करतो. "
"क्षमा भ्राताश्री . आपण तसदी नका घेऊ प्रभुकृपेने मला काहीही कष्ट पडत नाहीत प्रभुकार्यात. किंबहुना त्यांच्यां असीम कृपेने कोणतेही कार्य मी लीलया करू जाणतो. आपण आसन ग्रहण कराव . माझ्यासारख्या दासासमोर आपण तिष्ठत उभ राहण सयोग्य नव्हे"
" अरे पवनसुता तू दास नाहीस तुझी जागा माझ्याही हॄदयातच आहे. आपणच स्थान ग्रहण करून या आपल्या बंधुस उपकृत करावे, हे नम्र निवेदन स्वीकार कराव. "
हा वार्तालाप अजुन किती काळ चालला असता, पण अचानक मारुतिरायाला प्रभुंच्या कथनाची आठवण झाली आणि ते वदणार, इतक्यात भरत म्हणाला
" हनुमंता माझे आणि तुझे प्रभु कसे आहेत, सर्व कुशलमंगल आहे ना आणि माता जानकी व भ्राता लक्ष्मण सकुशल आहेत ना. त्यांचाच संदेश घेऊन तुझ आगमन झालय ना. आता अजून किती प्रतीक्षा करावी लागेल,कारण प्रभुनी मला वचन दिल होत आणि त्यानुसार ..............."
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
२७/०१/२०१८
जय श्रीराम
Comments
Post a Comment