ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास १०
.या सर्व मानसिक गुन्तागुंतित आनन्दा चा एक समान धागा होता तो म्हणजे प्रभु श्रीरामांचे आगमन, तेदेखील १४ वर्षान्च्या प्रदीर्घ वनवासानंतर. खरच ही इतकी प्रदीर्घ चौदा वर्षानची वाटचाल आणि तयाला कारणीभूत घटनांचा मागोवा घेण्याची कोणाचीही मनस्थिति आज नाही. एक ओझ मनावरुन उत्तरल्यानन्तर जशी मानसिक स्थिति व्हावी तशीच काहीशी स्थिति थोड्याफार फरकाने सर्वांचीच होती. तरीही त्यातल्या त्यात सर्वात जास्त दडपण हे भ्राता भरताची माता कैकई जी १४ वर्षात कधीही महालाबाहेर आली नाही.
कोणत्याही परिणामाना तयार असून इतके बोल पुत्र भरताने क्रोधाने १४ वर्षानपुर्वी सुनावल्यानन्तर त्याचा परिणाम आज अजूनही तिच्या मनामध्ये घर करून आहे. म्हणूनच प्रत्यक्ष ज्याला आपण शिक्षा केली काहीही प्रमाद नसताना त्याने बोल लावले तर कदाचित केलेल्या अपराधाच प्रायश्चित्त होऊ शकेल निदानपक्षी परिमार्जन तर होईल असा तिच्या मनाचा ध्यास होता आणि म्हणून सर्वात जास्त प्रतिक्षेत तीच होती धास्तावलेली पण मनाने पूर्ण तयार असलेली. अर्थात समस्त अयोध्यावासी जरी स्वागतासाठी सज्ज होऊन जमा झालेले असले तरी कैकई बाहेरच क़ाय पण कक्षा बाहेर येण्याचा प्रश्नच नव्हता.
इतक्या उत्साहवर्धक वातावरणात जो तो असतानाच इकडे पुष्पक विमानाने देखील उद्दाण भरले आणि अयोध्येच्या दिशेने प्रयाण सुरु केले. मोठा लांबचा पल्ला होता. आणि वरुन प्रभु सर्वाना आपला येण्याचा मार्ग समजावून सांगत होते. विमानात असलेली प्रत्येक व्यक्ति या सर्वाचा उत्साहात आनंद घेत होती. विमानातून जाण्याची मौज आणि प्रभुंचा माता जानकी सह लाभलेला सहवास ही जणू एक अलौकिक गोष्ट होती सर्वांसाठी.
स्वतः माता जानकी अश्या वेळी विविध विचारानी भारलेली होती. वरुन शांत भासत असली तरीही मनाच्या आतल्या वैचारिक आन्दोलनाचा अंदाज फक्त प्रभुनाच होता. म्हणूनच ते मधेच जानकीला म्हणाले,
"मैथिली चौदा वर्षान्चा प्रदीर्घ काळ नजरेसमोर येत असेल ना , आणि या सर्वात तुझी काहीही चूक नसताना तुला विनाकारण शिक्षा झाली माझ्यामुळे. "
" नाही प्रभु असा विचार कधीही या मनाला क्षणमात्रही स्पर्शू शकणार नाही. विवेक जागा असलेला सजीव कधीही चुकीचा विचार करणार नाही. आणि आपण तर माझे अंतरंग जाणता."
" मग क़ाय गहन विचार करते आहेस ते तरी सांग"
" प्रभु मी माता कैकई यांचा विचार करते आहे, कारण जे आपल्या प्रारब्धी होत तेच त्यानी घडवून आणल, इतकाच त्यांचा प्रमाद. आणि जऱ काही अपराध असेलच तर तो।आपला सर्वांचाहि आहे. कारण आपणच आपल्या पूर्वजन्मिच्या कर्मानुसार हे भोग आपल्या प्राक्तनात लिहिलेत. त्यांमुळे सुनिश्चितपणे त्याचे उत्तरदायित्व आपलेच आहे. म्हणून मला त्यांचीच सदैव चिंता असते. आज भेटिनन्तर समक्ष या चिंतेचा सोक्षामोक्ष लावीन . आपलेही तेच विचार असणार जाणून आहे मी"
" जानकी तुझा आणि माझा भिन्न विचार असु शकत नाही. मलासुद्धा प्रथम माता कैकईला भेटून ही अपराधित्वाची जाणीव आणि किल्मीष मातेच्या मनातून काढून टाकायचे आहे. "
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment