|| ओमकार रे नाम निर्गुण रे रूप ||
ओमकार रे नाम, निर्गुण रे रूप
साकार जाहले परब्रम्हस्वरूप
ओमकार रे .........
साकार जाहले परब्रम्हस्वरूप
ओमकार रे .........
जगता कारणे साधीयले सर्व
उपाधी धारसी परी व्यापक मर्म
बांधीयले जग सारे, आधार जे कर्म
ओमकार रे ........
उपाधी धारसी परी व्यापक मर्म
बांधीयले जग सारे, आधार जे कर्म
ओमकार रे ........
जड़जीव लक्ष लक्ष जगता धाडले
तुझे रूप अंशमात्रे तयामाजी घातले
ऊद्धाराया आत्मनः मानव हा जन्म
ओमकार रे .......
रूप तुझे गुण तुझे भासती अनेक
जयालागी भाव जैसा तैसेची चिंतन
तरीही रे सगुणातीत खरे तुझे रूप
ओमकार रे .......
काया दिली मानवा साधाया मोक्ष
तयासाठी मार्ग तूच निर्मिसी कैक
जया ज्ञान जाहले साधेल साधन
ओमकार रे ........
उद्धाराया जगता येसी अवतारे
कलीयुगी नाही सगुणी, नामावतारे
नाम हेच कर्मधर्म, नाम हेची सर्व
ओमकार रे .......
© कवी : प्रसन्न आठवले
०६/०१/२०१८
०६:३४
तुझे रूप अंशमात्रे तयामाजी घातले
ऊद्धाराया आत्मनः मानव हा जन्म
ओमकार रे .......
रूप तुझे गुण तुझे भासती अनेक
जयालागी भाव जैसा तैसेची चिंतन
तरीही रे सगुणातीत खरे तुझे रूप
ओमकार रे .......
काया दिली मानवा साधाया मोक्ष
तयासाठी मार्ग तूच निर्मिसी कैक
जया ज्ञान जाहले साधेल साधन
ओमकार रे ........
उद्धाराया जगता येसी अवतारे
कलीयुगी नाही सगुणी, नामावतारे
नाम हेच कर्मधर्म, नाम हेची सर्व
ओमकार रे .......
© कवी : प्रसन्न आठवले
०६/०१/२०१८
०६:३४
Comments
Post a Comment