प्रारब्ध भोगे बहु पिडलो मी
प्रारब्ध योगे कष्टावलो मी
प्रारब्ध सोसुन पस्तावलो मी
दयाळा कृपा करी ll १ ll
योगे वासनेच्या झुंजित आलो
लक्षावधी योनि फिरुनी आलो
कर्मातला वाटे कुबड़ी जहालो
सोडवी बा अनंता ll २ ll
शत्रु सहा त्रास देती देहाला
परिणाम त्यांचे न साहे मनाला
उधळीत अश्वावीण निघाला
सांभाळ मज कृपाळा ll ३ ll
मज पाऊले न आता जमणे
कारुण्य डोळ्यात दाटून येणे
इतुके होऊनी दया ही न येणे
शोभे ना हरी तयाला ll ४ ll
पुसावे कुणी लेकरा मायेवीण
दिसावे कसे आसऱ्या तुजवीण
वादळ वाढेल भीति जाणवून
कृपार्थ धावून ये रे ll ५ ll
कोटि जन्मात नाही उमगले
तुची एक त्राता ना समजले
गुरुराया तुम्ही समजावले
कृपासिंधु व्हावे आता ll ६ ll
© कवन : प्रसन्न आठवले
२७/०१/२०१८
०८:२८
Comments
Post a Comment