ती ओढ अनावर झाली
ती ओढ अनावर झाली
हि आशा अलगद आली
तूज भवती जीवन माझे
सारे ती मिसळून गेली
ती नजर तूझी रे धुंद
करीतसे मला बेधुंद
तू भाव अनामिक माझे
तूजसमिप ओढून नेसी
ती ओढ .....
हि मनात आली लाट
नकळे तूज आपोआप
कि कळूनी सारे सखया
मज याद न का रे करसी
ती ओढ .....
या मनात प्रतिमा ती रे
खिळवून मला ठेवी रे
अन नजर तूझ्या प्रतिमेला
या मनी साठवून ठेवी
ती ओढ ....
तू क्षितिजाचीच दिशा रे
असशी तू दूर सदा रे
मी पाठी तुझ्या सखया रे
हा प्रश्न मनास विचारी
ती ओढ ....
कवी: प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment