Skip to main content

जन्म आणि नामस्मरण लेख २

जन्म आणि नामस्मरण लेख २

©® संकल्पना, माडणी आणि लेखन : प्रसन्न आठवले. 

१. स्वतःमधील दोष व अवगुण दूर व्हावेत म्हणून :
मनाच्या गाभ्यात असलेले भय, भूक, निद्रा व मैथुन हे चार मुख्य घटक, ईश्वराने माणसाला सुद्धा दिले, याचं मुख्य कारण, प्रकृती आणि पुरुष यांचा समन्वय साधला जावा आणि मानवी वंश, प्राणीमात्रांप्रमाणेच, अविरत, कोणत्याही अडसराशिवाय वा हस्तक्षेपाशिवाय पुढे जात रहावा, या एकमेव उद्देशाने, हे चार मूळ प्रवृत्ती पर गुण, मनात स्थापित केले. अर्थात मनात स्थापित करताना, विचार, विवेक, बुद्धी यांसह जिज्ञासा, ज्ञानप्राप्तीची लालसा, शिकत पुढे जाण्याची वृत्ती, हेदेखील, त्याचं ईश्वरी अधिष्ठानाने, प्रदान केले. 

मुळात एक लक्षात ठेवा किंवा कोरून ठेवा. माणसाला या छोट्याश्या देहात प्रकृती पुरुष यांसह जे जे प्रदान केलं आहे, ते ते सर्व युगाच्या सुरुवाती पासून, ते कल्पांतापर्यंत पुरेसं दिलेलं आहे. हे नक्की. म्हणजेच नराचा नारायण होण्या साठी आवश्यक सर्वच, माणसाच्या ठायी आहेच. पण त्या नराचा असुर करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा बहाल करताना, ईश्वराने फक्त एक कर्मफल नियम त्यात घालून दिला.

म्हणजेच कल्पांतापर्यंत, ईश्वराला वास्तविक, या भुलोकी, नव्हे तर या ब्रम्हांडात लक्ष देण्याची आवश्यकता नाही आणि सर्व काही या नियमाने होतच राहील. प्रत्येक ब्रम्हांडात एक याप्रमाणे, जितकी ब्रम्हांड आहेत, तितके ब्रम्हारूप प्रतिनिधी निर्माण केले. हे त्या ईश्वराचे प्रतिनिधी किंवा चक्षु सुद्धा म्हणता येईल. ही सर्व निर्मिती करून, ईश्वर स्वतः, क्षीर सागरी समाधिस्थ झाला. पण मानवाला दिलेल्या स्वातंत्र्याच्या अमर्याद गुणांना, माणसानेच अवगुणात परिवर्तित केलं. 

मनाच्या अमर्याद इच्छा, ऊर्जा व शक्तीच्या बीजात, अनेक कर्म फलांची निर्मिती योजून, वास्तविक धोक्याची घंटीका, त्याचं मनाच्या उंबऱ्यावर, भयरूपात, आणून ठेवली आहे. ही झाली लक्ष्मण रेषा क्रमांक १. इतर प्राण्यात जी मूळ वृत्ती भोग भोगणे आणि जीव जगवणे, इतक्याच कार्यासाठी आहे, ती मानवात अमर्याद स्वातंत्र्याला मर्यादा यासाठी आहे. 

भुकेला मर्यादा आहे ती परिणामांची अर्थात पुन्हा कर्म फल न्यायाच्या कार्यवाहीची. म्हणजे ही झाली लक्ष्मण रेषा क्रमांक २. म्हणजे अती भूक तिचे परिणाम दाखवणार, हे नक्की. यात अभिप्रेत असलेली भूक म्हणजे देह चालवण्या साठी आवश्यक असलेली भूक आहेच. पण वासना, मद, मोह, लोभ यांचीसुद्धा अमर्याद भूक माणसाला देऊन ठेवली आहे. अर्थात त्या भुकेचे, सौम्य ते अती असे परिवर्तन करण्याचे स्वातंत्र्य मानवालाच दिलेले आहे. 

पण या अमर्याद स्वातंत्र्यात, गुण ते अवगुण यांचं दृढ नातं सुद्धा जोडून दिलेलं आहे. म्हणजे शारीरिक दृष्टीने पाहिलं तर, योग्य आहार, योग्य वासना सेवन आणि आपल्या भुकेची योग्य मर्यादा पालन, हा दैवजात गुण, हे एक टोक झालं. तर अमर्याद आहार, अमर्याद वासना भोग सेवन हे असुरी अवगुण, हे दुसरं टोक गाठण्याचं स्वातंत्र्य झालं. ही पूर्ण १८० अंशांची लक्ष्मण रेषा, हे स्वातंत्र्य, अठ्ठावीस युगे, अबाधित राहिलं आहे.

म्हणजे भय व भूक या मूळ प्रवृत्तीबरोबर, विचार विवेक व परिणाम जाणण्याची अमर्याद क्षमता, ही विशेष शक्ती सुद्धा,त्याचं ईश्वराने माणसाला दिली आहे.ज्याचा विकास विस्तार करण्याची अमर्याद शक्ती व ऊर्जा सुद्धा प्रदान केली आहे. 

म्हणजेच गुण ते अवगुण आणि मर्यादा ते अमर्यादा ही दोन टोकं गाठण्याची क्षमता मानवाला, देह प्राप्ती पश्चात प्राप्त होते. या एका अर्थानेच मानवी देह, सर्वश्रेष्ठ ठरतो. म्हणजे, याचं भुलोकी गुण आणि अवगुण यांचं संवर्धन होऊ शकतं. ते ठरवण्याची मुभा माणसालाच दिलेली आहे. त्यामुळे पुण्य संचय आणि पाप संचय असे दोन्ही प्राप्तीचे योग मानवी मनच ठरवू शकते आणि या देहाने प्राप्त करू शकते. 

क्रमशः

©® संकल्पना, माडणी आणि लेखन : प्रसन्न आठवले
०६/०९/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...