धुंदी
हां गुन गुन गुन गुन भ्रमर गुंजतो
मन गीत मधुर प्रेमाचे गाते
धुंद दिशा मोहरल्या साऱ्या
आसमंत प्रेमातच विरते
मन गीत मधुर प्रेमाचे गाते
धुंद दिशा मोहरल्या साऱ्या
आसमंत प्रेमातच विरते
या रंगीत रेशिम इंद्रधनुच्या
रंगातच फूलती कळ्या पाकळ्या
वारा मंद स्मित तव घेऊन
आला तव आठव तो आला
रंगातच फूलती कळ्या पाकळ्या
वारा मंद स्मित तव घेऊन
आला तव आठव तो आला
का तुझ्या जाणवल्या मज त्या
चेहऱ्यावर रेषा बावरल्या
मज घेऊन जा प्रिया जिथे रे
दशोदिशा का असुसलेल्या
चेहऱ्यावर रेषा बावरल्या
मज घेऊन जा प्रिया जिथे रे
दशोदिशा का असुसलेल्या
का ओढ़ मना जाणवते भासे
तुज पाशी ती घेऊन जाते
फूले शहारा अंगावर तो
तू धुंद चांदणे होऊन जाते
तुज पाशी ती घेऊन जाते
फूले शहारा अंगावर तो
तू धुंद चांदणे होऊन जाते
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment