Skip to main content

।।जय श्रीराम ।।



।।जय श्रीराम ।।


||अविजेय राम आत्मानंद राम शिष्योत्तम राम || तादात्म्य राम जानकीजीवन राम परोपकारी राम|| पुरुषोत्तम राम दोषहारि राम त्रिदेवपूजीत राम|| मनोवांछित राम महापुरुष राम भक्ततारक राम|| असुरसंहारक राम उत्तम पुत्र राम सर्वदाता राम|| उत्तम भ्राता राम त्रिगुणदोषनिवारक राम सर्वभयनिवारक राम|| देवोत्तम राम नरोत्तम राम सगुणात्मक राम|| निर्गुणात्मक राम आत्मोन्नत्ती राम जटाधारी राम|| पादुकात्मक राम पितृवचनांकित राम ममुद्धारक राम|| त्राहि त्राहि माम् राम|| श्रीराम श्रीराम श्रीराम||

वरील गुण वर्णनापलीकडे असलेल्या, ब्रम्हांडाभोवतेवेढे वज्रपूच्छे करू शकणाऱ्या हनुमंताचं परमदैवत, अहिल्योद्धारक, त्राटीकासंहारक, मर्यादापुरुषोत्तम, जगदोद्धारक, प्रजापालक, प्रभुश्रीराम एक सगुण आणि निर्गुण, नियम, योग, जीवन, चैतन्य, अतुल्य, अजेय, आणि अजोड़ व्यक्तित्व. एका अर्थाने मानव, नियमबद्ध, नियतीचालक असूनहि,  स्वतः मर्यादा आखून, त्यांचा पालनकर्ता, म्हणून पूर्ण आयुष्य, सहजाकार वृत्तीने, व्यतीत करणारा, सृष्टिकर्ता, धर्ता व हर्ता असा  आत्मयोगी . संयमाची स्वयम मूर्ति, पण समरांगणी शत्रूच्या छातीत धडकी भरणारा, एक महायोद्धा, महाशूर, परमप्रतापी ,प्रसंगी वन्ही होऊ शकणारा वीर.

तुजवीण शम्भो  मजकोणतारी म्हणून आपण जयाला आपण पूजतो त्या प्रत्यक्ष महादेवांनी ज्याला गूरू म्हणून मानलं अगदी कल्पांतापर्यंत आणि त्यांनी प्रार्थिले की हे पतितपावना, शरणांगता रक्षीतू   जगता तारी तू , तूची आधार तयांचा    स्मरती  जे भक्त तुज आणि  हरण करी संकटी तयांचे स्मरण करी जो तूझेअशी ग्वाही प्रत्यक्ष महादेवांनी दिली. कळीकाळाच्या सीमांपलीकडे जो आहे पण भक्तवतसल या उपाधीत बद्ध असल्यामुळे जो भक्तांच्याच हृदयात सतत निवासी असा तो तूच माझ्या शब्दांची आज शक्ती होऊन प्रकट हो मला शब्दांच अमूल्य वरदान देहे रामा ये माझ्या शब्दातीत असलेल्या रामा शब्दात प्रकट होये प्रभो ये माझ्या स्वामी  ये रे ये नको आता अंत पाहू.  
 
 
नाही बोलवत आता माझे शब्द थीटे या तुझ्या प्रेमा पाहूनीयामी अजाण कोण कुठे ठाऊक ना तूची एक आधार .  तू येरे रामा नको अंत पाहू ये प्रकटोनी ऊभा राही मज पुढती वंदीतो तूजलागी भक्त एक.   ये आता आतूर मी एकवार तुज सांगेता  शोधशील भक्तांना एकवार फिरून पुन्हा ये वदतो मी एक जीर्ण पर्ण जणूक्षीण असे माझी भक्तीपण येरे साद देई तुजला तो मी फकीर.  जगताच्या कल्याणा होउ नये तो उशीर,  त्वरी येरे हे मित्राआता नच राहे धीर मलायेरे ये धावूनीयासाद  कशी नच पोचे तव कानी भास्करा





शब्द : कैवाल्यमुर्ती प्रभूश्रीराम                     लेखनीक : प्रसन्न आठवले
 


Comments

  1. vrushali kanthi1 April 2015 at 03:41

    khup chan explaination...kami shabdat ani to the point

    ReplyDelete
    Replies
    1. dhanyawad vrushali je suchala ani samor disala tech lihilay pan tyacha karta dharta pratyaksha shri ram ahet he nishchit

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...