कविता
ये माझ्या कविते ये ये माझ्या कविते ये ।।धृ ।।
सरसरून ये भरभरून ये सळसळून ये
वर्षा सारखी शिशिरासाराख्री ये बहरलेल्या वसंतासारखी ये
शृंगारिक रसासारखी ये मोहरलेल्या गुलमोहरासारखी ये
अम्रपल्लवा सारखी ये पिंपळ पानासारखी ये ।।१।।
ये माझ्या कविते ये ये माझ्या कविते ये ।।धृ ।।
तळमळून येउ नकोस कळवळून येऊ नकोस
ग्रीष्मा सारखी येऊ नकोस वैशाखा सारखी येऊ नकोस
उफाळलेल्या समुद्रा सारखी येऊ नकोस
घोंघावणाऱ्या तुफाना सारखी येऊ नकोस ।।२।।
ये माझ्या कविते ये ये माझ्या कविते ये ।।धृ ।।
शांत सागरा सारखी ये शीतल झुळुके समान ये
तांडवा सारखी येऊ नकोस उत्ताना सारखी येऊ नकोस
समाधिस्थ महेशा सारखी ये ध्यानस्थ र्हुशिकेषा सारखी ये
पाटीवरील शारदे सारखी ये वक्रतुंड मोरया सारखी ये ।।३।।
ये माझ्या कविते ये ये माझ्या कविते ये ।।धृ ।।
विणे सारखी ये झंकारत घंटे सारखी ये नादावत
तबल्या सारखी ये थिरकत मृदुंगा सारखी ये वाजत
सतारीच्या बोलासारखी ये घुन्घरांच्या पावलांनी ये
मंजूळ बासरी सारखी ये कृष्णाचा पावा बनून ।।४।।
ये माझ्या कविते ये ये माझ्या कविते ये ।।धृ ।।
उसळलेल्या लाटा शांत करणार्या आकाशा सारखी ये
अंधाराचा नाश करणार्या सुर्य प्रकाशा सारखी ये
मृगेन्द्रा सारखी ये नरेंद्रा सारखी ये सुरेन्द्रा सारखी ये
मृगजळा सारखी न येता जलाधारांसारखी ये ।।५।।
ये माझ्या कविते ये ये माझ्या कविते ये ।।धृ ।।
गिधाडा सारखी येऊ नकोस गरुडा सारखी ये
घरीसमान सूर मारून विजेसारखी ये
कृष्णा सारखी ये आणि योगेश्वरा सारखी ये
मेनकेसारखी येऊ नकोस राधे सारखी ये ।।६।।
ये माझ्या कविते ये ये माझ्या कविते ये ।।धृ ।।
वाट पाहतोय तुझी मी शृंगारिक होऊन ये
आरक्त नेत्रांनी तृप्त करणार्या सौंदर्ये सारखी ये
ये माझ्या कविते ये ये माझ्या कविते ये
ये माझ्या कविते ये ये माझ्या कविते ये ।।७।।
ये माझ्या कविते ये ये माझ्या कविते ये ।।धृ ।।
कवी : प्रसन्न आठवले
माझी पहिली कविता
Comments
Post a Comment