दिलीपकुमार - भाग ४
७० च्या दशकात त्यांची कारकिर्द उताराला लागली. या दशकात आलेले
१९७० "गोपी" (सायरा बानू बरोबर पहिला), १९७२ "दास्तान" आणि १९७६ मध्ये
"बैराग" (तिहेरी भूमिका आणि नायिका सायरा बानू आणि लीना चन्दावरकर) फार यश मिळवू शकले
नाहित. त्यामुळे त्यांनी ५ वर्ष सिनेमा पासून विश्रांती घेतली
पाच वर्षांच्या विश्रांतीनंतर १९८१ साली प्रदर्शित झालेला आणि स्वातंत्र्य संग्रामातील एका क्रांतिकारकाची व्यक्तिरेखा असलेला "क्रांती" सिनेमा हा त्या वर्षातील एक यशस्वी सिनेमा होता. १९८२ साली त्यांचा सुभाष घई दिग्दर्शित "विधाता" आणि रमेश सिप्पी यांचा "शक्ती" हे मल्टिस्टार चित्रपट झकळले. यात विधाता मध्ये शम्मीकपूर , संजीवकुमार आणि संजय दत्त आणि शक्ती मध्ये अमिताभ बच्चन हे कलाकार त्यांच्यासोबत होते. यातील "शक्ती" मधील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना आयुष्यातील आठवा फिल्म्फेअर पूरस्कार मिळाला.
१९८३ साली बी.आर. चोप्रा यांचा "मजदूर" राज बब्बर सोबत , १९८४ साली यश चोप्रा यांचा "मशाल" अनिलकपूर सोबत आणि रमेश तलवार यांचा "दुनिया" ऋषी कपूर सोबत हे चित्रपट झळकले. यातील मशाल आणि मजदूर हे त्या त्या वर्षातील यशस्वी चित्रपट ठरले होते. १९८६ साली आलेला सुभाष घई यांचा "कर्मा" एक सुपरहीट चित्रपट ठरला . यात सुद्धा नूतन, नसरुद्दिन शाह , अनिलकपूर, जॅकि श्रॉफ अशी तगडी स्टार कास्ट होती. १९९१ साली राज कूमार आणि दिलीपकूमार यांना परत एकदा एकत्र आणणारा सुभाष घई यांचा "सौदागर" हा चित्रपट झळकला. या आधी हे दोन कलाकार १९५९ साली "पैगाम" या चित्रपटात एकत्र आले होते. सौदागर हा पण व्यावसायिक दृष्ट्या एक यशस्वी चित्रपट होता.
यानंतर त्यांनी प्रथमच दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकत "कलिंगा" चित्रपटाची घोषणा केली पण हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नहि. १९९८ साली त्यांची दुहेरी भूमिका असलेला "क्किल्ला" हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा त्यांच्या आयुष्यातील आतपर्यन्तचा शेवटचा चित्रपट आहे . आज दिलीपकुमार वयाच्या ९२ व्या वर्षी एक समाधानाच आयुष्य जगात आहेत.
त्यांनी फिल्म फ़ेअर पुरस्कार मिळवलेले चित्रपट :१. दाग - १९५३
२. आझाद - १९५५
३. देवदास - १९५६
४. नया दौर - १९५७
५. कोहिनूर - १९६०
६. लीडर - १९६४
७. राम और श्याम - १९६७
८. शक्ती - १९८२.
त्यांना मिळालेले इतर पुरस्कार
फिल्म फ़ेअर लाइफ़ टाईम अचिएवेमेन्ट अवार्ड १९९३. पद्मभूषण १९९१ आणि पद्मविभूषण २०१५. दादासाहेब फाळके पुरस्कार १९९४.
२०११ मध्ये गिनीज बुकात "हयात असलेल्या भारतीय कलाकारांपैकी सर्वात जास्त पुरस्कार मिळालेला कलाकार " या शीर्षका अंतर्गत दिलीपकुमार यांच नाव नोंदवण्यात आल.
----------०००----------
शब्दांकन आणि संकलन : प्रसन्न आठवले
आभार - विकिपीडिया
Comments
Post a Comment