Skip to main content

Posts

Showing posts from October, 2025

भोग आणि ईश्वर भाग ६५६

भोग आणि ईश्वर भाग ६५६ ©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले  सूक्ष्म देह हा, स्थूल देहात प्रवेश केल्यावर, गर्भात असताना, कोणत्याही बाह्य गोष्टींचा परिणाम किंवा कोणत्याही बाह्य विषयाशी संबंध आलेला नसतो. त्यावेळी तो शुद्ध स्वरूपात असतो आणि आपल्या आधीच्या कर्मांची माहिती असल्यामुळे, ईश्वराची क्षमायाचना करून, केलेल्या चुकांचं आणि अपराधांचं परिमार्जन करण्याच्या आणाभाका घेत असतं. कारण मृत्यू पश्चात आत्म्यासह गेलेल्या सूक्ष्म देहाला गत जन्मातील गोष्टींचं स्मरण असतं.  हे स्मरण स्थूल देहात असताना, देहाच्या मर्यादेमुळे विस्मृतीत गेलेलं असतं. म्हणजेच गर्भात तेच स्मरण शिल्लक असतं. पण गर्भरुपातून, बाह्य जगतात येताच, पुन्हा विस्मृतीचा पडदा पडतो. अर्थातच याला देहाच्या, ज्ञानेंद्रियांच्या, कर्मेंद्रियांच्या मर्यादा कारणीभूत आहेत. एकदा बाहेर आलेला बालक या जगताचा होईपर्यंत त्या स्मृती शिल्लक असतात. पण जसजसा देह वाढत जातो. सूक्ष्म देहाला या जगाच्या मर्यादांचा, मायेचा, अतृप्त इच्छा वासना, इत्यादी सहा शत्रूंचा पाश वेधून टाकतो. त्या क्षणापासून तो जीव गत जन्मातील कर्मांचा हिशोब विसरून, प्राप्त देहाच्...

भोग आणि ईश्वर भाग ६५५

भोग आणि ईश्वर भाग ६५५ ©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले  सूक्ष्म देह आणि स्थूल देह या दोन्हींनी कर्म होतात हे आपण पाहिलं. पण प्रत्यक्षात सूक्ष्म देह इच्छा, वासना, क्रोध, इत्यादी. भाव निर्माण करतो. पण त्यांचं शमन हे स्थूल देहा मार्फतच होतं. त्या अर्थाने सर्व कर्म ही स्थूल देहाने केलेली असल्यामुळे, खरंतर फलरूप शिक्षा किंवा बक्षीस हे त्या देहालाच व्हायला हवंय. पण प्रत्यक्षात जी कर्म फलरूपाला पक्व होत नाहीत ती, संचित रूपात गंगाजळीत शिल्लक राहतात.  हिशोबाच्या भाषेत सांगायचं झालं तर, करंट म्हणजे चालू काळाची व संचितातील परिपक्व फळांची देणी व घेणी चालू काळात वसूल होऊन, ते चालू काळात (अर्थात सध्याच्या जन्मात) भोग व उपभोग रूपात समोर येतात. त्याचं नफातोटा पत्रक म्हणजे आपलं या देहातील, या जन्मातील जीवन. जे भोगून होणार नाही किंवा अपूर्ण अथवा अपरिपक्व फल असेल ते पुढील जन्मासाठी संचित स्वरूपात ताळेबंदात शिल्लक राहील.  ते सूक्ष्म देहात साठवून आत्मा, शरीर सोडताना पुढील जन्मासाठी घेऊन जाईल. आता प्रश्न तरीही अनुत्तरित राहतो की, जर सर्व भाव भावना सूक्ष्म देहातील मन बुद्धी चित्त आणि अहंकार...

भोग आणि ईश्वर भाग ६५४

भोग आणि ईश्वर भाग ६५४ ©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले    काल एक गोष्ट लक्षात आली असेल की, सूक्ष्म देह आणि स्थूल देह मिळून जो खेळ आयुष्यभर खेळतात, त्याच्या परिणामांची छाया पुढच्या जन्मात, त्या जन्मातील स्थूल व सूक्ष्म देहाला मिळून भोगावी लागते. आत्मा मात्र चैतन्य रूपात त्या कार्याला साक्षीत्व देतो. म्हणजे फक्त स्थूल देह नाही तर सूक्ष्म देह सुद्धा या सर्वात भागीदार असतो. मन विचार करतं, बुद्धी त्याचं विश्लेषण करून कार्य करण्यास देहाला प्रवृत्त करते. मनात येणारे सर्व विचार वृत्ती रूपाने चित्तात साठवले जातात. त्या वृत्तीचं पुढे व्यक्तिमत्वात रूपांतर होऊन, ती त्या व्यक्तीची ओळख होते. यातूनच त्या व्यक्तीला हीन दर्जाचा, लंपट, क्रोधी, तापट, शांत, सोशिक, सात्विक, राजसी, इत्यादी उपाध्या प्राप्त होतात. तो त्या व्यक्तीचा गुणधर्म होतो. तो त्रिगुणातील एक किंवा अधिक गुणांच्या मिश्रणाचा संचय होतो. या गुणांवर आपण नंतर चर्चा करूया. नंतर त्या उपाध्या त्याच्या स्वभावाचा भाग बनतात. म्हणूनच एखादा मनुष्य मूलतः रागीट, चिडचिड करणारी, शांत, मनमिळावू, सुस्वभावी, इत्यादी इत्यादी असल्याचं आपण म्हणतो....

भोग आणि ईश्वर भाग ६५३

भोग आणि ईश्वर भाग ६५३ ©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले    मनाने, बुद्धीने आणि आत्म्याने जे काही  केलं जातं, त्याला सुद्धा कर्म म्हणतात. कारण सूक्ष्म देह आणि आत्मा, या देहात असेपर्यंत, त्या देहातील सूक्ष्म देहाने, जे काही विचार केले जातील, त्याच विचारांनी काही कार्यांना गती दिली जाते. जरी नुसते विचार केले गेले, तरीही त्या विचारांसाठी ऊर्जा, शक्ती व ओज तेज खर्च होईलच. म्हणजेच जिथे काही खर्ची पडतं तिथे नक्कीच काही निर्माण होतं. मात्र निर्माण झालेलं खर्च झालेल्या ऊर्जेने, ज्या विचारांच्या लहरी, तरंग किंवा vibrations अर्थात vibes निर्माण झाले, त्यानुसार त्या कर्माच्या बीजाची निर्मिती होते. जशी बीज निर्मिती असेल, त्याप्रमाणे त्या कर्माचं झाड आणि त्याला त्या प्रकारची फलनिष्पत्ती होणार. हे सर्व तार्किक वाटलं तरीही, सत्य आहे. आपण इतक्या सूक्ष्मात जाऊन विचार करत नाही. कारण आपण तितकं चिंतन करतच नाही. परंतु आपल्या पूर्वजांनी, ऋषी मुनी, विद्वान या शास्त्रज्ञांनी याचा खोलात जाऊन विचार, चिंतन, अभ्यास आणि तपशीलवार मांडणी केली. त्यांना त्यांच्या ज्ञानाच्या, मनातील प्रगाढ खोलीच्या आणि ...

भोग आणि ईश्वर भाग ६५२

भोग आणि ईश्वर भाग ६५२ ©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले    या विश्वात म्हणजे अनंत ब्रह्मांडं असलेल्या या जगतात (पूर्ण व्यापक अर्थाने आणि दृष्टीने), फक्त पृथ्वी नामक ज्ञात ग्रहावर, आपण 700 ते 800 कोटी मानव आहोत. बाकीचे प्राणी वेगळे. म्हणजेच तितके स्थूल देह, सूक्ष्म देह आणि आत्मे या पृथ्वीवर व्यक्त स्वरूपात वावरत आहेत. यामध्येच विश्वनियंत्याच्या भव्य स्वरूपाची कल्पना येईल. तितकीच व्यापक मायेची शक्ती आहे, जी या विश्वातील प्रत्येक जीवाला ब्रह्माशी बांधून ठेवून, स्वतः अज्ञात आहे.  यामध्ये प्रत्येक माणसाचं आयुष्य वेगळं आहे. क्वचित एखादा माणूस संपूर्ण पृथ्वीवर दुसऱ्या माणसाप्रमाणे तंतोतंत आयुष्य जगत असेल. ही आपल्या कल्पनेतील फक्त शक्यता आहे. अन्यथा, साधारण 700 ते 800 कोटी लोकं 700 ते 800 कोटी प्रकारचं आयुष्य जगतात, असं ठामपणे सांगता येईल. म्हणजेच प्रत्येकाची lifeline अर्थात जीवनरेखा भिन्न भिन्न मार्गाने जात असते.  याचं काहीतरी कारण असणारच. वैज्ञानिक दृष्टीने विचार केला तर, तितक्या विचार लहरी, तरंग या वातावरणात उमटत असतात. त्या एकमेकांना आकर्षित किंवा प्रतिकर्षित करत असती...

भोग आणि ईश्वर भाग ६५१

भोग आणि ईश्वर भाग ६५१  ©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले    आपल्या मनात येणारे विचार किंवा येणारा प्रत्येक विचार हा कुठेतरी कर्माशी निगडित असतो. किंबहुना आपण घेतलेल्या पहिल्या श्वासापासून सुरू झालेला या देहातील, हा प्रवास, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत, या जन्मात, संकेतात्मक किंवा संदेशात्मक असतो. आपल्या मनात आलेला विचार कृतीत येऊन, त्यातून घडणारं प्रत्येक कर्म हे कुठेतरी आधीच्या कर्माशी निगडित असतं.  त्याची शंभर टक्के संगती जोडणं, हे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना अशक्य असतं. अर्थातच ही संगती जोडून, त्याचा नेमका अर्थ लावणं हे अद्वितीय, अलौकिक ऊर्जा, शक्ती असलेल्या भूतलावरील, काही दिव्य सत्पुरुषांना शक्य असतं. त्यांना एखादी व्यक्ती पाहिल्यावर, त्याच्या आत्म्याचा इथवरचा प्रवास दिसतो आणि या देहातील आत्म्याची परतीची वाट कुठे चुकली, हे त्यांना समजतं. त्यानंतर ते सांगतात त्याप्रमाणे आपण केल्यास, पुढील मार्ग सुकर होत जातात. या मधे एक लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे त्यांचं मार्गदर्शन ही एक दिशा असते. उदाहरणार्थ आपण नवीन जागेचा पत्ता नवीन शहरात, गावात शोधत असताना, एखाद्या ...

भोग आणि ईश्वर भाग ६५०

भोग आणि ईश्वर भाग ६५० (पुन्हा सुरू) ©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले ही लेखमाला पुन्हा सुरू करत आहे. महाराजांची इच्छा असेल त्याप्रमाणे पुढे जाईल.  आपण प्रारब्ध, नशीब, luck, bad luck इत्यादी शब्द वापरतो. मुळात प्रारब्ध म्हणजे काय. कधीकधी ईश्वरेच्छा बालियसी सुद्धा म्हणतो. पण याचा नक्की अर्थ आपण न समजून घेता, हे शब्द वापरून, वास्तविक ते बोथट किंवा अर्थहीन केले आहे. त्याचप्रमाणे आपण ते सोयीनुसार सुद्धा वापरतो. मी सुद्धा मला यामध्ये मोजलेलं आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळी आपलं सर्व चांगलं होत असतं, त्यावेळी आपण माझ्या कष्टाला फळ मिळालं. किंवा देवाने माझ्या कष्टाचं चीज केलं असं म्हणतो.  कधीकधी आपण देवाला सुद्धा यात मधे आणत नाही. त्याऐवजी आपण म्हणतो. माझ्या कष्टाचं चीज झालं. पण हेच ज्यावेळी आपण नकारात्मक काळातून, वाईट घटना घडतानाच्या काळातून जातो, त्यावेळी मात्र, देवाचं माझ्याकडे दुर्लक्ष आहे, देव सुद्धा वेळेनुसार पाठ फिरवतो, देवाला माझ्याबद्दल काहीही प्रेम आस्था उरलेली नाही, मीच सापडलो / सापडले का देवाला त्रास द्यायला, माझं नशीबच फुटकं आहे. ही एक दुसरी बाजू आपलीच असते....