श्रीरुक्मिणी स्वयंवर ७ llश्रीगणेशाय नमःll llश्रीमुकुंदाय नमःll llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll विद्येचे , वाङ्मयाचे , शब्दांचे , बुद्धीचे दैवत श्रीगजानन आणि देवी श्रीशारदा यांना सादर वंदन. परमपावन, मंगलमय, जगतकारण आणि जगतपालक भगवान श्रीकृष्ण यांना प्रणिपात. माझे सद्गुरू श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी माझ्या अल्पमतीतुन हे कार्य करवून घेण्याचे योजिले आहे त्यांनाही साष्टांग दंडवत. हे तिन्ही लोकांतील देव ऋषी, गुरूवर आपण स्वये येऊन माझ्या लेखणीत अध्यात्मिक रसनिष्पत्ती करावी. त्यायोगे श्रोते व वाचक यांचे नेत्र व कर्ण तृप्तीप्रत न्यावेत. पण त्यातील तृप्तता पुढील वाचनाची अतृप्ती वा अभिलाषा जागृत करेल हे सुद्धा योजावे, ही नम्र प्रार्थना. ज्यायोगे आपले अस्तित्व आणि या कथेतील आपलाही सहभाग, कथेच्या संपूर्ण यात्रेत, निश्चित राहील आणि वाचकांना यातील शब्द, अर्थ, गहनार्थ, काव्यात नाथांनी मांडलेली अद्भुतता, रसाळता यांचे यथार्थ दर्शन या गद्य प्रवासात प्राप्त होईल. हे काव्य वाचताना नाथांचा एक एक शब्द किती अनमो...