तूझे मनाचे बोल
तूझे मनाचे बोल हे मी वाचले नयनी तुझ्या
हसुनी मला तू पाहिले प्रतिसाद हा वदनी तूझ्या
त्या मुग्ध शीतल तारका जणू बोलती आलाप हा
प्रीतीत त्या भेटीस जा जणू सांगाती तूज भाव हा
मीही मनोरथ या मनी वदलो तूला सांगावया
तूझे मनाचे .......
ती जीवघेणी विरहता सांभाळू आता का सखे
ती भेट होईल आपुली मज वाटते आहे सखे
या एकतेची जाण ती मी वाहतो कवनात या
तूझे मनाचे .......
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment