ऑडिटर
ऑडिटर ऑडिटर ऑडिटर
फक्त त्रासच त्रास जीवनभर
कामच काम सतत धावपळ
प्रवास दगदग फक्त गोंधळ
उन्ह,गर्मी पाऊस थंडी वारा
मिळेल तिथे करतो निवारा
खाण्यापिण्याचे हाल बेहाल
पोटाची वाट करतो एकच सवाल
कुठे तरी कुणी घर देता का घर
सतत फिरत राहायचं हॉटेलवर
आज इथे उद्या तिथे मिळेल त्या वाटे
थारा नाही, थांग नाही पत्ता नाही कुठे
काम केलं , निघालो परत काम करणे
आयुष्याची बेरीज वजा बाकी काही न उरणे
कायम टार्गेट कधी स्टाफ कडून
यांना खुश केलं तर क्लायंटकडून
कुणीही कधीहि यावं काही बोलावं
ढोल झालाय ढोल कुणीही बडवावं
विनातक्रार काम विनाआराम काम
बदल्यात शिव्याच विना स्वल्पविराम
कवी: प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment