क्षण
भेटून त्या क्षणाना क्षण जाहले निशब्द
तरी का न हे कळेना केले क्षणास् स्तब्ध
मन का न हेच माझे झाले क्षणास स्तब्ध
भेटून त्या .........
ती वेळ चंद्र गगनी अजूनी समोर नयनी
त्या तारकेस एका घायाळ पाहुनी मी
त्या मुग्ध शर्वरी ला भेटूनही हो न तृप्त
भेटून त्या .......
तू चंद्र प्रीत मी रे तू रात मी निशा रे
का क्षण न गोठले ते सारे तुझ्या सवे रे
तू करूनि बंदी क्षण ते केलेस आज मुक्त
भेटून ............
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment